'मिस युनिव्हर्स' चा 'किताब जिंकत हरनाज संधूने तब्बल २१ वर्षानंतर भारताला हा मुकुट परत मिळवून दिला आहे.
मिस युनिव्हर्स हरनाज संधू सध्या ब्यूटी विथ ब्रेन म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. तिचं सौंदर्य तिचा फॅशन सेन्स सर्वांना घायाळ करत आहे.
आज इतकी स्टायलिश आणि ग्लॅमरस डिवा असणारी हरनाज संधू काही वर्षांपूर्वी फारच वेगळी दिसत होती. हरनाजचे काही जुने फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
२०१७-१८ मध्ये हरनाज संधू अतिशय साधी-सिम्पल मुलगी होती. तिच्या अनेक जुन्या फोटोंमध्ये ती चुडीदारमध्ये दिसून येत आहे.
तीन वर्षांपूर्वी ती सोशल मीडियावरसुद्धा फारशी सक्रिय नव्हती. काही काळानंतर ती हळूहळू सोशल मीडियावर स्वतःला सक्रिय ठेवू लागल्याचं दिसून येतं
हरनाज संधूचे जुने फोटो पाहून कोणी अंदाजाही लावू शकत नाही, कि ही साधी-सिम्पल मुलगी मिस युनिव्हर्सचा 'किताब देशाला मिळवून देऊ शकते. मात्र जिद्दीच्या जोरावर तिने हे साध्य करून दाखवलं.
हरनाज संधूने या आधी अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तसेच तिने स्पर्धा जिंकल्यासुद्धा आहेत.
सध्या हरनाज संधू प्रत्येकासाठी स्टाईल आयकॉन बनली आहे. आज प्रत्येक जण तिला आपली प्रेरणा समजू लागला आहे.