जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / गायिका नेहा कक्कर म्हणाली- 'काळजी करू नका, मी मरणार नाही फक्त...'

गायिका नेहा कक्कर म्हणाली- 'काळजी करू नका, मी मरणार नाही फक्त...'

गायिका नेहा कक्कर म्हणाली- 'काळजी करू नका, मी मरणार नाही फक्त...'

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने (Neha Kakkar) सोशल मीडियाला अलविदा केले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) चं अचानक जाणं हा सर्वांसाठी मोठा धक्का होता. यानंतर सोशल मीडियावर विविध विषयांवरून चर्चा होत आहे. काहीजण नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं बोलत आहेत तर अनेकांनी त्याचा मृत्यू बॉलिवूडमधील नेपोटिझमशी जोडला आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकारांना, दिग्दर्शक-निर्मात्यांना चाहत्यांकडून किंवा इतर काही सेलिब्रिटींकडून लक्ष्य केलं जात आहे. सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं जात आहे. अशावेळी बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने (Neha Kakkar) सोशल मीडियाला अलविदा केले आहे. इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट शेअर करून तिने या आभासी दुनियेला काही काळासाठी राम राम केला आहे. यामध्ये ती म्हणते आहे की, ‘मी पुन्हा झोपायला जात आहे. जेव्हा एक चांगले जग निर्माण होईल तेव्हा मला झोपेतून उठवा. एक असं जग जिथे स्वातंत्र्य, प्रेम, आदर, काळजी, मज्जा, स्वीकृती आणि चांगली माणसं असतील. अशी जागा जिथे द्वेष, नेपोटिझम, मत्सर, जजमेंट्स, हुकमती माणसं, हिटलर्स, खून, आत्महत्या आणि वाईट माणसं नाहीत. शुभरात्री! काळजी करू नका मी मरणार नाही फक्त काही काळासाठी दूर जात आहे’. (हे वाचा- …जेव्हा करणसमोर कृती सेननने केलं होतं सुशांतचं कौतुक, पाहा VIDEO)

जाहिरात

गेल्या काही काळापासून असेच वाटत असल्याचं नेहा कक्करने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. त्याचप्रमाणे तिने ज्यांना वाईट वाटलं असेल त्यांची माफी देखील मागितली आहे. (हे वाचा- “मी तुमची पॉवर काढून घेतली”, ट्विटर एक्झिटनंतर सोनाक्षीचं ट्रोलर्सना उत्तर )

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात