मुंबई, 22 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानं त्याच्या कुटुंबीयांसोबतच त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. 14 जूनला सुशांतनं मुंबईतल्या त्याच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर बरेच वाद सुरू आहे. ज्यात निर्मात करण जोहरला बरंच ट्रोल सुद्धा केलं गेलं आहे. पण यासोबतच सुशांतशी संबंधीत काही थ्रोबॅक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. असाच एक कृती सेननचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या व्हिडीओमध्ये कृती करण जोहरसमोरच सुशांतचं कौतुक करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला कृती सेननचा हा व्हिडीओ करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमधील आहे. ज्यात करण कृतीला काही अभिनेत्यांची नावं देतो आणि त्यांच्या अभिनयाच्या कौशल्यानुसार रेटिंग द्यायला सांगतो. ज्यात कार्तिक, वरुण, आयुष्मान, सुशांत, टाइगर यांची नावं असतात. यावर कृती टॅलेंटनुसार सुशांतला पहिला नंबर देते. ती 'सुशांत, वरुण, कार्तिक, आयुष्मान, टाइगर' असं उत्तर देते.
याशिवाय दीपिका पदुकोणचा सुद्धा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ दीपिकाच्या एका जुन्या मुलाखतीचा आहे. जिथे तिला विचारण्यात आलं होतं की, परफॉर्मन्ससाठी तू कोणत्या अभिनेत्याला सर्वाधिक रेटिंग देशील. त्यावर दीपिका सुशांतचं नाव घेते आणि सांगते, मला सुशांत सिंह राजपूतचा अभिनय खूप आवडतो.
करिअरच्या सुरुवातीच्या काळत त्यानं बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं. सुशांतनं त्याच्या अभिनय करिअरची सुरुवात 2009 मध्ये पवित्र रिश्ता या मालिकेतून केली होती. त्यानंतर 2013 मध्ये 'काय पो छे' या सिनेमातून त्यानं बॉलिवूड पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं ‘शुद्ध देसी रोमांस', ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी', ‘राबता', ‘केदारनाथ' और ‘सोनचिड़िया' या सारख्या सिनेमात काम केलं.