नुकताच माहिती समोर आली आहे, की शाहरुखच्या बहुप्रतीक्षित चित्रपटाची शूटिंग पुणे (महाराष्ट्र) येथे सुरु आहे. त्यामुळे चाहत्यांना जास्तच उत्सुकता लागली आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटात शाहरुखसोबत साऊथ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारासुद्धा(Nayantara) दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. नयनतारा आणि शाहरुख यांनी पुण्यात बरंचस शूटिंग केल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान नव्या माहितीनुसार शाहरुख खान आणि नयनतारा यांच्या चित्रपटाचं नाव 'लॉयन'(Lion) असं आहे. साऊथचे ट्रेड अनॅलिस्ट मनोबाला विजयबालन यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक डॉक्युमेंट जाहीर केलं आहे. यामध्ये एका बाजूला सिंहासोबत शाहरुख खानचा फोटो आहे. तर दुसिकडे लॉयन असं चित्रपटाच्या नावाचं कागदपत्र आहे. मात्र हे कागदपत्र कितपत खरं आहे. याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती मिळालेली नाही. (हे वाचा: रणबीर कपूर OTT वर करणार धमाकेदार एन्ट्री! अशी असणार स्क्रिप्ट) 'लॉयन' हे चित्रपटाचं खरं नाव आहे. की फक्त शूटिंग दरम्यान हे नाव वापरलं जात आहे. याबद्दल कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाही. मात्र या चित्रपटात शाहरुख आणि नयनतारासोबत सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर आणि प्रियामनी यांच्यासुद्धा दमदार भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. शाहरुखच्या या चित्रपटासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. तसेच पहिल्यांदाच साऊथ अभिनेत्री नयनतारासोबत शाहरुख खानची केमिस्ट्री पाहण्यासाठीसुद्धा उत्सुक झाले आहेत. (हे वाचा:ऐश्वर्या मला सोडून.... ' अभिषेकने सांगितला हनीमूनचा अजब किस्सा ) तसेच काही दिवसांपूर्वी शाहरुख आपल्या एका व्हायरल व्हिडीओमुले चर्चेत आला होता. यामध्ये शाहरुखला फोमो झाल्याचं दाखवण्यात आलं होतो. अर्थातच इंडस्ट्रीतुन गायब होण्याची भीती. डिजिटलवर सर्व अभिनेत्यांनी एंट्री केली आहे, मात्र शाहरुख अजूनही डिजिटल प्लॅटफॉर्मवर झळकलेला नाही या आशयाचा तो व्हिडीओ होता. मात्र हि हॉटस्टार डिस्नेची एक जाहिरात होती. पण या कारणाने शाहरुख खान डिजिटल प्लॅटफॉर्मवर झळकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.As per this letter, #ShahRukhKhan's next with director #Atlee film name is #Lion.#Nayanthara #Priyamani pic.twitter.com/HBCLG4IncX
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) September 15, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Shahrukh khan