काही दिवसांपूर्वी नवभारत टाइम्सला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उदित नारायण यांना नेहा आणि आदित्यच्या लग्नाबाबत विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना उदित नारायण म्हणाले, ‘नेहा खूपच गोड मुलगी आहे. मला ती आवडते आणि तिनं तिच्या करिअरमध्ये खूप नावही कमावलं आहे. विशेष म्हणजे नेहा आणि आदित्यची जोडी चांगली जमतेय. मला बाकी काही माहित नाही पण जर नेहा आमच्या घरची सून झाली तर मला खूप आवडेल. आमच्या घरात एक फिमेल सिंगर सहभागी होईल.’ पारस छाब्राच्या गर्लफ्रेंडला Bigg Boss च्या घरातील ‘या’ स्पर्धकाशी करायचंय लग्न
होस्टिंग दरम्यान आदित्य नेहमीच नेहाशी फ्लर्ट करताना दिसतो. त्यामुळे हे वृत्त कितपत खरं आहे याची कोणतीही पुष्टी झालेली नाही. त्यामुळे नेहा कक्कर तिच्या लग्नाच्या वृत्तावर काय प्रतिक्रिया देते याची सर्वांना उत्सुकता आहे. कारण वर्षभरापूर्वी नेहाचा ब्रेकअप झाला असून त्यावेळी ती डिप्रेशनची शिकार झाली होती. मात्र आता ती यातून बाहेर पडली आहे. ‘हो मी कार्तिकला डेट करते पण...’ रिलेशनशिप स्टेटसवर सारा अली खानचा खुलासा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aditya narayan, Bollywood, Neha kakkar