जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'गर्भवती असल्याचं कळताच निर्मात्यांनी मला...'; नेहा धुपियाचा खुलासा

'गर्भवती असल्याचं कळताच निर्मात्यांनी मला...'; नेहा धुपियाचा खुलासा

'गर्भवती असल्याचं कळताच निर्मात्यांनी मला...'; नेहा धुपियाचा खुलासा

नेहा म्हणाली, ‘या वर्षात तिला अनेक प्रोजेक्ट्सवर काम करायचं होतं. पण जेव्हा त्या प्रोजेक्ट्सच्या निर्मात्यांना तिच्या प्रेग्नन्सीबद्दल कळलं तेव्हा त्यांनी नेहाला प्रोजेक्ट्समधून काढून टाकलं.’

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई 21 फेब्रुवारी : अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) नुकतीच यामी गौतम (Yami Gautam) स्टारर ‘अ थर्सडे’ (A Thursday) या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील नेहा धुपियाची बोल्ड स्टाईल (Bold Style) पाहून चाहते खूपच प्रभावित झाले आहेत. याचं कारण म्हणजे नेहाने 8 महिन्यांची प्रेग्नंट (8 month pregnant) असूनही चित्रपटात काम केलंय. अनेक जुन्या समजुतींना तडा देत नेहाने 8 महिन्यांची गर्भवती असूनही चित्रपटासाठी शूटिंग केलं. यासाठी नेहाचं विशेष कौतुक होतंय. नेहा धुपियाने अलीकडेच तिच्या कामाच्या अनुभवाबद्दल सांगितलंय. तसंच प्रेग्नंट असल्यामुळे अनेक प्रोजेक्टच्या निर्मात्यांनी तिला बाहेर काढलं, असा खुलासाही तिने केलाय. नेहा म्हणाली, ‘या वर्षात तिला अनेक प्रोजेक्ट्सवर काम करायचं होतं. पण जेव्हा त्या प्रोजेक्ट्सच्या निर्मात्यांना तिच्या प्रेग्नन्सीबद्दल कळलं तेव्हा त्यांनी नेहाला प्रोजेक्ट्समधून काढून टाकलं.’ या संदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय. अभिनेता होण्यापूर्वी टीव्ही शोमधला ‘राम’ होता वॉचमन, एका मालिकेनं बदललं आयुष्य नेहा धुपिया दोन मुलांची आई आहे. तिने ‘अ थर्सडे’ या चित्रपटात उत्तम काम केलंय. शिवाय नेहाने 8 महिन्यांची गर्भवती असताना चित्रपटात काम केल्यामुळे तिचं विशेष कौतुक होतंय. तिने या चित्रपटात गर्भवती पोलिसाची भूमिका साकारली आहे. इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, नेहा गर्भवती असल्याची माहिती मिळताच अनेक प्रोजेक्ट निर्मात्यांनी तिला प्रोजेक्टमधून काढून टाकलं आहे, असा खुलासा तिने केलाय. नेहानं सांगितलं की ‘अ थर्सडे’ मधील तिची भूमिका गर्भवती महिलेची नव्हती. परंतु जेव्हा तिने निर्माते बेहजाद खंबाटिया यांना आपण प्रेग्नंट असल्याचं सांगितलं, तेव्हा तिला वाटलं की हा प्रोजेक्टही आपल्या हातून निघून जाईल. पण बेहजाद यांनी चित्रपटाच्या कथेत बदल करत नेहाला हा रोल करू दिला.

    आशुतोष देशमुख कुटुंबासमोर देणार अरुंधतीवरील प्रेमाची कबुली

    याशिवाय नेहा जेव्हा पहिल्यांदा गर्भवती राहिली तेव्हा तिचे काही प्रोजेक्ट बाकी होते. ‘मेहेर पोटात असताना मला काम करायचं होतं. म्हणून मी माझे स्वतःचे पॉडकास्ट (podcast) केले. कारण मला स्वतःला अनुभवायचं होतं आणि गर्भवती असणं ही कोणती अडचण नसल्याचं सिद्ध करायचं होतं, असं नेहा सांगते. ‘मी प्रेग्नंट राहिल्यापासून ते मेहरच्या जन्मापर्यंत काम केलं. इंडस्ट्री (film industry) आता बरीच बदलली आहे. कारण पहिल्यांदा जेव्हा मी गरोदर असल्याचं सांगितलं तेव्हा मी करत असलेले प्रोजेक्ट माझ्या हातातून गेले. मला त्या प्रोजेक्टमधून काढून टाकणं योग्य होतं का? अर्थात गर्भवती महिलेत अनेक शारीरिक बदल होतात. परंतु जे लोक तुम्हाला ते काम देतात, त्यांच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अनेकदा त्यांना असं काही पडद्यावर दिसावं असं वाटत नाही,’ असं नेहाने सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात