मुंबई, 20 फेब्रुवारी- छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (aai kuthe kay karte) मालिका सततच्या ट्वीस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. आता मालिका एका वेगळ्या वळणावर आहे. अरूंधतीने देशमुखांचे घर कायमस्वरूपी सोडलं आहे. आता यानंतर अरुंधती काय निर्णय घेणार याची सर्व वाट पाहत आहे. या सगळ्यात आता एक नवीन माहिती समोर आली आहे. मालिकेत एक मोठा ट्वीस्ट येणार आहे. ज्या देशमुख कुटुंबाने अरुंधतीला चारित्र्याच्या संशयावरून घऱातून बाहेर काढले त्यांच्या समोरच आशुतोष अरुंधतीवरील प्रेमाची (aai kuthe kay karte upcoming twist) कबुली देणार आहे. त्यामुळे यावर अनिरुद्धसह देशमुख कुटुंबाची प्रतिक्रिया कशी असणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. एका पोर्टलनं आई कुठे काय करतेच्या येणाऱ्या ट्वीस्टचा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मालिकेत लवकरच आशुतोष अरूंधतीवरील प्रेमाची कबुवी देशमुख कुटुंबासमोर देणार आहे. त्यामुळे हा ट्वीस्ट प्रेक्षकांना आवडतो का हे पाहणं देखील उत्सुकतेचे असणार आहे. वाचा- ऋतिक रोशनचा फरहान अख्तरच्या लग्नात ‘सेनोरिटा’ गाण्यावर भन्नाट डान्स अनिरूद्धपासून घटस्फोट घेतल्यानंतर अरुंधतीने वेगळ्या आयुष्याला सुरूवात केली आहे. जी अरूंधती प्रत्येक गोष्टीवरतिच्या पायावर सक्षमपणे उभी राहिली आहे. मात्र यानंतरही अनिरुद्ध सतत तिच्या मार्गात अडचणी निर्माण करत आहे. तिचं नवीन गाण देखील आलं आहे. सगळीकडं तिचं कौतुक होत आहे. असं असताना अनिरुद्धने अरुंधतीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे आता तिने देशमुखांचं घर सोडलं आहे. परंतु, हे घर सोडल्यानंतर तिची आणि आशुतोष यांच्यातील मैत्री आणखीनच घट्ट होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे हळूहळू का होईना आशुतोषच्या मनात अरूंधतीविषयी प्रेम भावना निर्माण होऊ लागली आहे. पण तो कधी व्यक्त झाला नाही. मात्र त्यांने मैत्री देखील प्रामाणिकपणे निभावली आहे.
त्यामुळे प्रेक्षक हा येणारा ट्वीस्ट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. कारण आशुतोष अरुंधतीच्या साधेपणावर प्रेम करतो तसेच तिच्या कामाचा देखील सन्मान करताना दिसतो. त्यामुळे प्रेक्षकांना अनिरूद्धपेक्षा आशुतोष जास्त आवडायला लागला आहे हेही तितकच खरं आहे.