जान्हवी कपूरच्या शॉर्ट्सवर कतरिनाची कमेंट, सोनम कपूरने दिलं उत्तर

जान्हवी कपूरच्या शॉर्ट्सवर कतरिनाची कमेंट, सोनम कपूरने दिलं उत्तर

जिम विअर आणि वर्किंग ड्रेसअपमध्ये ओव्हर द टॉप असेल अशा एका अभिनेत्रीचं नाव सांगायला नेहाने कतरिना सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 02 जून- कतरिना कैफ आणि सलमान खान सध्या त्यांच्या आगामी भारत सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याचसाठी कतरिना नेहा धुपियाच्या शोमध्ये गेली होती. यावेळी कतरिनाने जान्हवी कपूरच्या कपड्यांबद्दल चिंता व्यक्त केली. कतरिनाची ही गोष्ट सोनम कपूरला फारशी आवडली नाही. तिने कतरिनाला जशास तसं उत्तर द्यायचं ठरवलं.

जिम विअर आणि वर्किंग ड्रेसअपमध्ये ओव्हर द टॉप असेल अशा एका अभिनेत्रीचं नाव सांगायला नेहाने कतरिना सांगितलं. या प्रश्नाचं उत्तर देताना कतरिना म्हणाली की, ‘ती ओव्हर द टॉप नाहीये पण तिचे तोकडे कपडे पाहिल्यावर मला तिची चिंता वाटते. ती माझ्याच जिममध्ये येते. आम्ही अनेकदा एकत्र व्यायाम करतो. पण अनेकदा तिचे शॉर्ट्स मला चिंतेत पाडतात.’ कतरिनाच्या या उत्तरावर जान्हवीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण सोनमने मात्र तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून कतरिनाला उत्तर दिलं.

Sacred Games च्या बंटीला क्रिकेट खेळताना लागला बॉल आणि नंतर...


सोनमने इन्स्टाग्राम स्टेटसमध्ये जान्हवीचा डेनिम शॉर्टमधला फोटो शेअर करत कॅप्शन दिले की, ‘ती दररोजच्या कपड्यांमध्येही सुंदर दिसते.’ सोनमच्या या फोटोमध्ये कतरिनाच्या नावाचा उल्लेख नसला तरी ही पोस्ट तिच्याचसाठी होती असं म्हटलं जातं.

अभिनयाशिवाय ‘या’ क्षेत्रातही काम करते सोनाक्षी सिन्हा
सैफ-करिनाच्या लग्नाचा फोटो व्हायरल, असे दिसायचे सारा- इब्राहिम

बॉलिवूडमध्ये कॅट फाइट ही सर्वसामान्य गोष्ट आहे. सोनमने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत कॅट फाइट केली आहे. आता या यादीत कतरिनाचं नावंही जोडलं गेलं असंच म्हणावं लागेल. कतरिनाच्या सिनेमाबद्दल बोलायचं तर येत्या ५ जूनला तिचा बहूप्रतिक्षित भारत सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमात कतरिनाने कुमुद नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे.

VIDEO: नाशिकच्या गोदावरीत अजय देवगणने केलं वडिलांचं अस्थी विसर्जन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2019 12:27 PM IST

ताज्या बातम्या