जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Good News: Neha Dhupia दुसऱ्यांदा झाली आई ; घरी झालं चिमुकल्या मुलाचं आगमन

Good News: Neha Dhupia दुसऱ्यांदा झाली आई ; घरी झालं चिमुकल्या मुलाचं आगमन

Good News: Neha Dhupia दुसऱ्यांदा झाली आई ; घरी झालं चिमुकल्या मुलाचं आगमन

बॉलिवूड अभिनेत्री आणि सुपर मॉडेल नेहा धुपियाच्या (Neha Dhupia) घरी नव्या पाहुण्याचे (Good News ) आगमन झाले आहे. नेमके तिच्या घरी तो की ती कुणाचे आगमन झाले आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. नेहा दुसऱ्यांदा आई (Mom) झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री आणि सुपर मॉडेल नेहा धुपियाच्या (Neha Dhupia) घरी नव्या पाहुण्याचे (Good News ) आगमन झाले आहे. नेमके तिच्या घरी तो की ती कुणाचे आगमन झाले आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. नेहा दुसऱ्यांदा आई (Mom) झाली आहे. याच्या अगोदर तिला एक क्युटशी मुलगी आहे जिचं नाव मेहेर आहे. तर आता तिच्या घरी बेबी बॉयचे आगमन झाले आहे. नेहाचा पती अभिनेता अंगद बेदीने (Angad Bedi) दुसऱ्या मुलाचे देखील स्वागत जोरात केले आहे. पतीने शेअर केली गोड बातमी नेहाचे पती आणि अभिनेता अंगद बेदी यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अंगदने इन्स्टाग्रामवर नेहा धुपियासोबत एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने, आपल्या मुलाच्या जन्माविषयी माहिती देत, त्याने त्याच्यासाठी चाहत्यांकडून प्रेम आणि आशीर्वाद देखील द्यावे असे म्हटले आहे. वाचा : Sidharth Shukla करत होता डिलिव्हरी बॉयचं काम? पिझ्झा डिलिव्हरी करतानाचे फोटो व्हायरल अंगदने काय म्हटले आहे पोस्टमध्ये ? अंगदने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘सर्वशक्तिमानने आज आम्हाला एका मुलाच्या रूपाने आशीर्वाद दिला आहे. नेहा आणि बाळ दोघेही ठीक आहेत. मेहेर नवीन पाहुण्याला ‘बेबी’ म्हणण्यास तयार आहे#बेडिसबॉय येथे आहे, या प्रवासात नेहाने एकाद्या शूर योद्धा असल्याप्रमाणे धाडस दाखवले त्यासाठी तिचे खूप आभार. आता आपण आपल्या प्रेमाने आमच्या चौघांचा हा प्रवास संस्मरणीय बनवूया. यासोबतच अंगदने हार्ट इमोजी देखील शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

जाहिरात

मेहेरचा जन्म दोघांच्या लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यांनतर झाला दरम्यान, 40 वर्षीय नेहा धुपियाने 2002 मध्ये मिस इंडियाचे विजेतेपद जिंकले होते. यानंतर 2003 मध्ये तिने ‘कयामत’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नेहाने 10 मे 2018 रोजी अंगद बेदीशी लग्न केले. नेहा आणि अंगदची पहिली मुलगी मेहेरचा जन्म दोघांच्या लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यांनतर झाला. 18 नोव्हेंबर 2018 रोजी मेहरचा जन्म झाला. नेहाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती अखेर काजोलच्या ‘हेलिकॉप्टर ईला’ सिनेमात दिसली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात