मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'नवऱ्याच्या मृत्यूनंतरही ही मजा करतेय..' ऋषी कपूर यांच्या मृत्यूवरून ट्रोल करणाऱ्यांना नीतूने दिलं सडेतोड उत्तर

'नवऱ्याच्या मृत्यूनंतरही ही मजा करतेय..' ऋषी कपूर यांच्या मृत्यूवरून ट्रोल करणाऱ्यांना नीतूने दिलं सडेतोड उत्तर

दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते  ऋषी कपूर (Rishi Kapoor) याचं निधन झालं. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अभिनेत्री नीतू कपूर यांना कशाप्रकारे ट्रोलिंगचा सामना कराव लागला याबद्दल पहिल्यांदचं सांगितलं आहे.

दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) याचं निधन झालं. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अभिनेत्री नीतू कपूर यांना कशाप्रकारे ट्रोलिंगचा सामना कराव लागला याबद्दल पहिल्यांदचं सांगितलं आहे.

दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) याचं निधन झालं. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अभिनेत्री नीतू कपूर यांना कशाप्रकारे ट्रोलिंगचा सामना कराव लागला याबद्दल पहिल्यांदचं सांगितलं आहे.

    मुंबई, 9 मे- अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज (Bollywood Celebrities) सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. हे सेलिब्रिटीज खासगी, व्यावसायिक जीवनातल्या घडामोडी, पर्यटन, शूटिंग दरम्यानचे फोटो, व्हिडिओ आणि कंटेट शेअर करत असतात. त्यांचे फॉलोअर्सही लाखोंच्या घरात आहेत. काहीवेळा एखाद्या पोस्टच्या अनुषंगाने यांनाही ट्रोलिंगचा (Trolling) सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला. दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत ऋषी कपूर (Rishi Kapoor) याचं निधन झालं. ऋषी कपूर यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली होती. नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूरसह संपूर्ण कपूर परिवार शोकाकुल होता. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी नीतू कपूर यांनी ट्रोलिंगचा सामना करवा लागला. यावर पहिल्यांदाच त्या व्यक्त झाल्या आहेत.

    काही दिवसांनी या धक्क्यातून सर्वजण सावरले. नीतू कपूरदेखील अनेक शोमध्ये सहभागी होऊ लागल्या. तसंच अन्य प्रोजेक्टवरही त्यांनी काम सुरू केलं. या घडामोडींच्या पोस्टही त्या नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत असतात. नुकतीच अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) ही जोडी विवाहबंधनात अडकली. या विवाह सोहळ्याचे तसंच कपूर कुटुंब आणि मित्र परिवारासोबतचे फोटो, व्हिडिओ नीतू यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. हा शाही विवाह सोहळा फॅन्सच्या दृष्टीनं चर्चेचा विषय ठरला होता. शो असो अथवा समारंभ प्रत्येक ठिकाणी नीतू कपूर यांचा वावर आणि सहभाग अगदी मनमोकळा, आनंदी असा असतो. नेमक्या याच कारणामुळे त्यांनी सोशल मीडियावर टीकेचा ( Neetu Kapoor Troll )सामना करावा लागला.

    वाचा-'... यासाठी आधी माझी हिंमतच होत नसे', Bold Photoshoot नंतर समंथाचा खुलासा

    ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर या त्यांच्या सौंदर्य आणि वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखल्या जातात. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी एकेकाळी अनेक हिट चित्रपट बॉलिवूड दिले आहेत. ही जोडी आजही प्रेक्षकांना खूप आवडते. ऋषी यांच्या निधनाच्या दुः खातून स्वतः ला सावरत नीतू यांनी पुन्हा काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. तसंच काही प्रोजेक्टवरही त्याचं काम सुरू आहे. या घडामोडींची माहिती त्या सातत्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे देत असतात.

    वाचा-शशांकला झालं अप्पूवर प्रेम पण अपूर्वासमोर सांगू शकेल का तो मनातील भाव?

    त्यांचे अलीकडच्या काळातले काही व्हिडिओ आणि फोटो पाहून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. `पतीच्या मृत्यूनंतरही या मजा करत आहेत,` अशा स्वरूपाच्या कमेंट्स युजर्स करत आहेत. त्यावर नीतू कपूर यांनी एका मुलाखतीत सडेतोड उत्तर दिलं असून, अशा ट्रोलिंगचा त्या सामना कसा करतात हेदेखील सांगितलं आहे.

    नीतू कपूर म्हणाल्या ``जे लोक मला ट्रोल करतात, त्यांना ब्लॉक (Block) करते. कारण पतीच्या मृत्यूपश्चात मी मजा करते, असं त्यांना वाटतं. त्यांची ही मनोवृत्ती चुकीची आहे. त्यांना पतीच्या निधनामुळे सतत रडणारी, व्यथित झालेली महिला पाहायला आवडतं. अर्थात ही गोष्ट आवडणारा विशिष्ट असा वर्ग आहे. त्यांना मी ब्लॉक करते. मला असंच राहायला आवडतं आणि मी असंच राहणार आहे. माझ्या दुः खातून मी या पद्धतीने सावरणार आहे. काही लोक सतत रडून दुः खातून सावरतात. काही लोक आनंद व्यक्त करून दुःखातून सावरतात. मला याच मार्गाने जायचं आहे. मी माझ्या पतीला (ऋषी कपूर) कधीही विसरू शकत नाही. तो माझ्या हृदयात, माझ्यासोबत आहे. माझ्या मुलांसोबत आहे आणि आयुष्यभर राहणार आहे,`` असं नीतू कपूर यांनी स्पष्ट केलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Bollywood News, Entertainment, Marathi entertainment