मुंबई, 9 मे- स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी (thipkyanchi rangoli) मालिका कमी काळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यास यशस्वी झाली आहे. सर्वांना अप्पू आणि शशांकची केमेस्ट्री देखील प्रचंड आवडत आहे. नुकतंच या मालिकेत बाबी आत्याच्या लग्नसोहळा पार पडल्याचे पाहायला मिळाला. मागच्या काही दिवसांपासून प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण जवळ आला आहे. शशांकला अप्पूवर प्रेम झालं आहे. त्यामुळं शशांक त्याच्या मनातलं अप्पूला सांगेल का याचा उलगडा (thipkyanchi rangoli latest episode) येणाऱ्या भागातच होईल. स्टार प्रवाह वाहिनीनं नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये शशांकला अप्पूवर प्रेम झाल्याचे दिसत आहे.त्यानं अप्पूला मनातलं सांगण्याची तयारी देखील केली आहे. शशांक त्याच्या मनातलं अप्पूला सांगेल का..या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या भागातच उलगडतील. शशांकला जरी अप्पूवर प्रेम झालं असलं तरी अप्पू त्याचं प्रेम स्वीकरणार का मालिकेत आणखी कोणता नवीन ट्वीस्ट पाहायला मिळणार याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे. वाचा- पाठक बाईंनी साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच राणादासाठी केला खास Video शेअर स्टार प्रवाह वाहिनीवर ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून एकत्र कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे. यात कानिटकर आणि वर्तक कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अपूर्वा वर्तक आणि शशांक कानिटकर ही जोडी प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे.
‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून अप्पूच्या रूपात अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर घराघरात पोहोचली आहे.ज्ञानदा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत काही ना काही पोस्ट शेअर करत असते.तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला चाहते भरभरून दाद देत असतात.