Home /News /entertainment /

VIDEO : नीतू कपूर यांना Jug Jug Jeeyo च्या सेटवर होती 'ही' अडचण!

VIDEO : नीतू कपूर यांना Jug Jug Jeeyo च्या सेटवर होती 'ही' अडचण!

ऋषी कपूर यांच्या निधनांनंतर एका ब्रेकनंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) एका मोठ्या फिल्मचा भाग झाल्या आहेत. या फिल्मबद्दल बोलताना त्यांना एका अडचणीला सामोरं जावं लागलं असं त्यांनी सांगितलं आहे.

  मुंबई 26 जून: नीतू सिंग (Neetu Singh) या जेष्ठ अभिनेत्रीच्या दुसऱ्या इंनिंगला दमदार सुरवात झाली आहे. ऋषी कपूर (Rishi Kapoor wife) यांच्या बायकोने त्यांच्या जाण्यानंतर बऱ्याच काळाने सिल्वर स्क्रीनवर कमबॅक केला आहे. त्यांचा ‘जुग जुग जियो’ (Jug Jug Jeeyo) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे ज्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. असं जरी असलं तरी नीतू सिंग यांना या फिल्मच्या सेटवर काही अडचणी आल्या होत्या ज्याबद्दल त्या बोलताना दिसल्या. रणबीरच्या आईने (Ranbir Kapoor mother) ऎशींचं दशक तिच्या तुफान अभिनयाने गाजवलं होतं. दिवार, यादों की बारात, कला पथ्थर अशा हिट चित्रपटांमध्ये नीतू सिंग दिसून आल्या होत्या. पती ऋषी कपूर यांच्या आकस्मिक निधनानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी मोठा ब्रेक घेतला. ऋषी यांच्याशिवाय बाहेर पडायची सुद्धा त्यांना हिम्मत नव्हती असं त्यांनी सांगितलं होतं. पण मुलगा रणबीर आणि सून आलियाच्या आग्रहाखातर त्यांनी काम करायला पुन्हा सुरवात केली. नीतू यांनी शूटिंगच्या पहिल्या दिवशी सेटवरुन सुद्धा फोटो शेअर करत कामाला सुरुवात केल्याची बातमी चाहत्यांना सांगितली होती. सेटवर धमाल मस्ती करत शूटिंग चालू होतं पण तरीही नीतू यांना कोणती अडचण येत होती याबद्दल त्या धर्म प्रॉडक्शनशी बोलताना म्हणाल्या, “मला एकच गोष्ट खूप खटकायची ते म्हणजे किआरा आणि वरुणच्या नॉनस्टॉप गप्पा. शॉट तयार असो किंवा मधे वेळ असो हे दोघे सतत बडबड करत असायचे. एकदा मी त्यांना विचारलं सुद्धा तुम्ही एवढं काय बोलत असता? मी कधी लक्ष न देण्याचा प्रयत्न केला तरी ते एवढे सतत बोलत असायचे की मला कंटाळा आला. ते सारख्या नॉन्सेन्स गप्पा ते मारायचे. नीतू यांनी अगदी हसतहसत ही गोष्ट शेअर केली.
  या टीमने ऑस्क्रीनसुद्धा बरीच धमाल केली. त्यांचे अनेक bts विडिओ समोर येत आहेत. या टीममध्ये एकाहून एक नमुने आणि धमाल भूमिका पाहायला मिळणार आहेत. एका अतरंगी फॅमिलीची गोष्ट पडद्यावर पाहायला मजा तर नक्कीच येईल हे खरं. ‘जुग जुग जियो’ फिल्मच्या स्टारकास्टने एकदम तगडं प्रमोशन करत सगळ्यांपर्यंत चित्रपट पोहोचवला आहे. मेट्रोमध्ये प्रवास करण्यापासून अगदी मॉल मध्ये जाऊन यंग जनरेशनशी कनेक्ट होईपर्यंत सगळ्या गोष्टी आनंदाने या टीमने केल्या.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Bollywood actress, Bollywood News, Kiara advani, Varun Dhawan

  पुढील बातम्या