मुंबई, 04 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता मागच्या काही काळापासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी कुमारी माता होणं हा माझ्या आयुष्यातला चुकीचा निर्णय होता असं म्हटलं होतं. त्यानंतर आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत त्या त्यांची मुलगी मसाबा गुप्ता हिच्या घटस्फोटामुळे. मसाबा आणि तिचा पती मधू मंटेना यांनी 2019 मध्ये घटस्फोटाची याचिका कोर्टात दाखल केली होती. त्यानंतर आता या दोघांचा घटस्फोट बांद्रा कोर्टानं मंजूर केला आहे.
मसाबा गुप्ता ही नीना गुप्ता आणि विवियान रिचर्ड यांची मुलगी आहे. नीना आणि विवियान यांच्या लग्नाच्या आधीच मसाबाचा जन्म झाला होता. त्यानंतर या दोघांमध्ये वाद झाल्यानं दोघंही वेगळे झाले आणि मसाबाचा सांभाळ नीना यांनी एकट्यानं केला. मसाबा आणि तिचा पती मधू मंटेना यांनी मागच्या वर्षी घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. या दोघांनी 2015 मध्ये लग्न केलं होतं. मधू मंटेना हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आहेत. मात्र 2018 मध्ये या दोघांमध्ये दुरावा आला. ज्यानंतर मसाबानं सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ती या नात्यातून वेगळी होणार असल्याचं जाहीर केलं होतं.
…आणि क्षणार्धात ‘मिस्टर इंडिया’प्रमाणे सनी लिओनी सुद्धा झाली अदृश्य, पाहा VIDEO
View this post on Instagram
मसाबानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, माझे कुटुंबीय, मित्र परिवार आणि आप्तेष्ट सर्वांनाच हे सांगताना दुःख होत आहे की मी आणि मधून घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. याबाबत आम्ही दोघांनीही आमच्या कुटुंबीयांना कल्पना दिली आहे. आम्ही यातून ब्रेक घेऊन आम्हाला नक्की आमच्या आयुष्यातल्या अपेक्षा काय आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. हा आमच्यासाठी खूप कठीण काळ आहे.
मुंबईची राजभाषा मराठीच! मनसेच्या दणक्यानंतर हिंदी मालिकेचे निर्माते नरमले
मसाबा गुप्ता फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तर तिचा पती मधू मंटेना सुप्रसिद्ध निर्माता आहेत. मधू मंटेना यांनं 'गजनी', 'रण', 'मौसम' सारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. मसाबाची आई अभिनेत्री नीना गुप्ता यांच्यासाठीही त्यांच्या मुलीचा हा निर्णय धक्कादायक होता.
'त्याने माझ्या ड्रिंकमध्ये ड्रग्स मिसळले आणि...', रश्मी देसाईचा गौप्यस्फोट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Masaba gupta