• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अमोल कोल्हे यांच्या एकांतवासावरून अखेर पडदा हटला; स्वत: VIDEO पोस्ट करत सांगितलं कारण

अमोल कोल्हे यांच्या एकांतवासावरून अखेर पडदा हटला; स्वत: VIDEO पोस्ट करत सांगितलं कारण

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (DR Amol Kolhe) यांनी 7 नोव्हेंबर रोजी एकांतवासात जाण्याबाबत पोस्ट केली होती. यानंतर अनेक तर्कवितर्क आणि चर्चा रंगू लागल्या होत्या. आता डॉ. अमोल कोल्हे यांनी समोर येऊन यामागचे कारण सांगत सर्व उलट सुलट चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

 • Share this:
  मुंबई, 13 नोव्हेंबर- राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (DR Amol Kolhe) यांनी 7 नोव्हेंबर रोजी एकांतवासात जाण्याबाबत पोस्ट केली होती. यानंतर अनेक तर्कवितर्क आणि चर्चा रंगू लागल्या होत्या. आता डॉ. अमोल कोल्हे यांनी समोर येऊन यामागचे कारण सांगत सर्व उलट सुलट चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी यामागचं खरं कारण सांगितलं आहे. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी युट्यूबवर (Dr. Amol Kolhe YouTube Video) व्हिडीओ टाकत म्हटलं आहे की, मी एकांतवासात 7 नोव्हेंबर रोजी जाण्याबाबत पोस्ट केली. त्यानंतर तर्कवितर्क आणि चर्चा रंगू लागल्या. माझ्या एकांतवासाविषयी अनेक चर्चा रंगल्यानंतर मला असं वाटलं की, आपण स्वत:च याचा उलगडा करावा. अमोल कोल्हे म्हणाले की, माझ्या एकांतवासाबाबत अनेकांनी वेगवेगळे अर्थ काढले. काहींनी तर राजकीय संन्यासाविषयी तर काहींनी डायरेक्ट पक्षांतरबाबत देखील भाष्य केलं. मात्र माझ्या एकांतवासात जाण्याचं कारण होतं मानसिक विश्रांतीचं आहे, असं ते म्हणाले. आपण व्यक्त कुठं व्हायचं हा प्रश्न उभारतो आणि मग साचलेपण येत. त्यातून मधुमेह, हृदयविकार असे अनेक विकार समोर येतात. त्यामुळं व्यक्त होणं, मोकळं होणं महत्वाचं आहे. व्यक्त होणं हे जीवंतपणाचं लक्षण आहे, असं ते म्हणाले. डॉ अमोल कोल्हे म्हणाले की, आपण माझी काळजी केली. अनेक जण माझ्या एकातंवासाच्या पोस्टवर व्यक्त झाले. मला मात्र, यातून एक जाणीव झाली. ती म्हणजे आपल्या मानसिक आरोग्याच्या जाणिवेची गरज. तुमच्या-माझ्यासारख्या माणसाला येणारा आणि दुर्लक्षिला जाणारा मानसिक थकवा. ही मला सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटली. आपण अनेक दुर्दैवी बातम्या ऐकतो. वयाच्या तिशीच ह्रदविकारानं मृत्यू, पस्तीशित मधुमेह. अस्थमा, वगैरे. या साऱ्या आजाराचे मूळ आपल्या मानसिकतेत आहे, असे एक डॉक्टर म्हणून कोल्हे यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले. हे वाचा- फक्त मॉडेल नव्हे तर 'डॉक्टर' आहे Umar Riaz; 'बिग बॉस 15'मुळे मिळाली लोकप्रियत ते पुढे म्हणाले, आपल्याला पुरुषानं रडायचं नाही, त्यानं हळवं व्हायचं नाही हेच माहितंय. आपलं हळवेपण, भावना सार्वजनिक करायच्याच नाहीत. शिव्या देणं, कणखर असणं म्हणजेच पुरुष, असं शिकवलं गेलं आहे. स्वप्न, आकांक्षा, गरजेच्या सीमारेषा पुसट झाल्या. आपण कशासाठी धावतोय, हेच विसरलो. एकवेळ आपण धावताना थकतो. त्यावेळी शरीर थांबतं, पण मनाचं काय, असा सवाल त्यांनी यावेळी केला. त्याचं उत्तरही त्यांनी दिलं. ग्रामीण भागातून शहरात येणारा प्रत्येक जण विभक्त कुटुंबात स्थिरावतो. त्याला मन कुठं मोकळं करायचं हेच समजतं नाही. त्याच्या आत खूप काही साचत जातं. यातूनच मधुमेह, ह्रदयविकार इतर आजार जडतात. त्यामुळं व्यक्त व्हा, मोकळे व्हा. हे होताना स्वतःला कमकुवत समजू नका. कणखरपणा वगैरे ही सारी बेगडी विशेषणं आहेत, असं देखील अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितलं. मानसिक थकवा स्वीकारणं गरजेचं आहे. मी या एकांतवासात काय शिकलो हे नक्कीच तुम्हाला कळेल. कुणी एकांतवासात जातोय म्हणजे त्याला नकारात्मक का घ्यायचं. त्याला सकारात्मक पद्धतीनं का घेऊ शकत नाहीत. मला या एकांतवासात एक व्यक्त होण्याचं माध्यम सापडलं असं डॉ. अमोल कोल्हे यावेळी म्हणले. हे वाचा- 'टिप टिप बरसा पानी' गाण्यावर उर्फीचा जलवा; बोल्ड VIDEO सोशल मीडियावर VIRAL डॉ अमोल कोल्हे यांची काय पोस्ट होती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काही दिवसापूर्वी फेसबुक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी मनन आणि चिंतनाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच आतापर्यंत घेतलेल्या निर्णयाचा विचार आणि फेरविचार करण्यासाठी आपल्याला एकांत हवा असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. सिंहावलोकनाची वेळ:- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय..थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय.. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू...नव्या जोमाने, नव्या जोशाने. फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही, असंही कोल्हे म्हणाले होते.
  Published by:News18 Trending Desk
  First published: