• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'टिप टिप बरसा पानी' गाण्यावर उर्फी जावेदचा जलवा; बोल्ड VIDEO सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

'टिप टिप बरसा पानी' गाण्यावर उर्फी जावेदचा जलवा; बोल्ड VIDEO सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

बॉलिवूडचे (Bollywood) असे अनेक चित्रपट आहेत, ज्यातील गाणी कित्येक वर्षानंतरही एव्हरग्रीन आहेत. त्यातीलच एक म्हणजे 'टीप टीप बरसा पानी' (Tip Tip Barasa Pani) होय. बॉलीवूड 'खिलाडी' अक्षय कुमार आणि प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनच्या 1994 मध्ये रिलीज झालेल्या 'मोहरा' चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं आहे.

 • Share this:
  मुंबई, 13 नोव्हेंबर- बॉलिवूडचे  (Bollywood)  असे अनेक चित्रपट आहेत, ज्यातील गाणी कित्येक वर्षानंतरही एव्हरग्रीन आहेत. त्यातीलच एक म्हणजे 'टीप टीप बरसा पानी'  (Tip Tip Barasa Pani)  होय. बॉलीवूड 'खिलाडी' अक्षय कुमार आणि प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनच्या 1994 मध्ये रिलीज झालेल्या 'मोहरा' चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं आहे. आजही हे गाणं लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. रिपोर्टनुसार, त्यावेळी या गाण्याची लोकांमध्ये इतकी क्रेझ होती की अनेक लोक फक्त हे गाणे पाहण्यासाठीच चित्रपटगृहात जात असत. आणि आजही लोकांमध्ये या गाण्याची क्रेझ पाहायला मिळते.
  View this post on Instagram

  A post shared by Urfi (@urf7i)

  दरम्यान, आता टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदने  (Urfy Jawed)  या गाण्यावर डान्स करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो तिच्या चाहत्यांना खूप पसंत पडत आहे. उर्फीने तिचा हा व्हिडिओ तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. आतापर्यंत उर्फीचा हा व्हिडिओ इन्स्टावर ४३ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच व्हिडीओवर भरभरून कमेंट्ससुद्धा देत आहेत.उर्फी तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावरनेहमीच चर्चेत असते. 'बिग बॉस ओटीटी'च्या घरात तिने खूप धम्माल केली होती. उर्फी तिच्या बोल्ड आणि अतरंगी फॅशन सेन्समुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. शो संपल्यानंतरही उर्फी चर्चेत आहे. रोज उर्फी तिचा आउटफिट फ्लॉंट करताना दिसत आहे. तिचा फॅशन सेन्स खूपच बोल्ड आणि हॉट आहे. तिच्या या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Urfi (@urf7i)

  उर्फी जावेद आजकाल तिच्या इन्स्टा अकाउंटवर एकापेक्षा एक फोटो शेअर करताना दिसत आहे. ज्यामध्ये उर्फी जावेदचा अतिशय बोल्ड लूक दिसून येत आहे. एवढेच नाही तर ते शेअर करताच तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे काही लोक खूप प्रभावित होतात. पण अनेक लोक मीडियावरून प्रचंड ट्रोल करत असतात . उर्फी जावेद 'बिग बॉस ओटीटी'मध्ये सहभागी झाली होती. पण ती लवकरच घरातून बाहेर पडली होती. मात्र अल्पावधीतच तिने सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग वाढवली आहे. उर्फीचे सध्या इंस्टाग्रामवर दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या चाहत्यांना गुंतवून ठेवण्यासाठी उर्फी नियमितपणे इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत असते.उर्फी एक उत्तम गायिका देखील आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. तिला रॅपिंग आवडते. मुंबईत येण्यापूर्वी उर्फीने काही दिवस दिल्लीतील एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणूनही काम केले आहे. उर्फी जावेदने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात टीव्ही शो 'टेढी-मेढी फॅमिली' मधून केली होती. यानंतर 'बडे भैया की दुल्हनिया', 'नामकरण', 'मेरी दुर्गा' आणि 'जीजी माँ' यांसारख्या मालिकांमध्ये काम करून तिने आपली ओळख निर्माण केली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: