'बिग बॉस १५' सध्या प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. शोमधील वादविवाद, प्रेम, मैत्री, द्वेष सर्वांचं मिश्रण प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवत आहे.
2/ 8
शोमधील अनेक स्पर्धक प्रेक्षकांचे आवडते बनले आहेत. त्यातीलच एक म्हणजे मॉडेल, अभिनेता उमर रियाज होय. उमर रियाजला या शोमुळे मोठी लोकप्रियता मिळत आहे.
3/ 8
उमर रियाजने आपल्या जबरदस्त खेळीने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. सतत सोशल मीडियावर तो ट्रेंड झालेला दिसत आहे. आज आपण या स्पर्धकांबद्दल एक खास गोष्ट पहाणार आहोत.
4/ 8
आपल्या सर्वांनाच माहिती आहे, उमर रियाज हा एक मॉडेल आणि अभिनेता आहे. तो फारच हँडसम आहे.
5/ 8
मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे. की उमर एक डॉक्टर आहे. वाटलं ना आश्चर्य? मात्र हे खरं आहे. उमरनं २०१८ मध्ये आपलं एमबीए पूर्ण केलं आहे. तो एक सर्जन आहे.
6/ 8
जम्मू काश्मीरचा असणाऱ्या उमरने काही काळ डॉक्टरची प्रॅक्टिससुद्धा केली आहे. मात्र त्याने मॉडेल आणि अभिनेता म्हणून आपलं करियर बनवलं आहे.
7/ 8
उमर रियाजला बिग बॉसमुळे नवी ओळख मिळाली आहे. त्याला मोठ्या प्रमाणात पसंत केलं जात आहे. सतत तो सोशल मीडियावर चर्चेत असतो.
8/ 8
उमर रियाज हा मॉडेल आणि अभिनेता असिम रियाजचा लहान भाऊ आहे. असिम रियाजसुद्द्धा बिग बॉस १३ मध्ये होता. त्यालाही मोठी लोकप्रियता मिळाली होती.. तो शोचा फर्स्ट रनरअप ठरला होता.