मुंबई, 01 मे: महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला मराठमोळे प्रेक्षक तुफान प्रतिसाद देत आहेत. सगळ्या शहरात हा चित्रपट हाऊसफुल्ल होत आहे. ठिकठिकाणी प्रेक्षक चित्रपटाला मानवंदना देत आहेत. शाहीर साबळेंच जीवनचरित्र केदार शिंदेंनी मोठ्या पडद्यावर जिवंत केलं आहे. या चित्रपटातील गाणी देखील हिट होत आहेत. अजय अतुल यांचं संगीत असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक सांगीतिक पर्वणीच आहे. अशातच आता केवळ सामान्य प्रेक्षकच नाही तर राजकारणी मंडळींना देखील हा चित्रपट पाहण्याचा मोह आवरला नाही. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी हा चित्रपट पहिला असून त्यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाला महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अशातच शरद पवारांसाठी या चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. त्यांनी कुटुंबासहित येऊन हा सिनेमा पहिला आणि नंतर आपली प्रतिक्रिया नोंदवली. हा चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवार म्हणाले कि , ‘शेवटचं गाणं सुरु झालं आणि मी अंकुशला पूर्णतः विसरून गेलो, मला फक्त शाहीर साबळे दिसत होते.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
या आधीही शरद पवारांच्या हस्ते या चित्रपटातील महत्वाचं गाणं रिलीज करण्यात आलं होतं. शाहीर साबळे यांच्या या जीवनपटाच्या निमिताने त्यांनी अजरामर केलेले जय जय महाराष्ट्र माझा… है गीत रीक्रीएट केले गेले आहे. या गीताचा प्रकाशन सोहळा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मंगळवार दिनांक 25 एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये पार पडला होता. SS Rajamouli: पाकिस्तानने परवानगी नाकारल्याने अधुरं राहिलं एसएस राजामौलींच ‘ते’ स्वप्न; काय आहे नेमकं प्रकरण? केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात अंकुशने शाहीर साबळेंची भूमिका पडद्यावर जिवंत केली आहे. केदार शिंदेची लेक सना शिंदेने या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. सनाने या चित्रपटात शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती साबळे यांची भूमिका साकारली आहे. याबरोबरच अभिनेत्री अश्विनी महांगडे व निर्मिती सावंत यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या दोघांच्याही दमदार अभिनयानं प्रेक्षक भारावले असून त्यांच्या उत्तमोत्तम प्रतिक्रिया समोर येत आहेत. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात आतुरता होती. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ल बहरला हा मधुमास नवा, गाऊ नको किसना ही गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहेत. एवढंच नाही तर साता समुद्रापार असलेले परदेशी कलाकार ह्या गाण्यांवर रिल्स बनवताना दिसू लागले आहेत. महाराष्ट्र शाहीर चित्रपटाला प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देतील असा विश्वास कलाकारांना तसेच केदार शिंदे यांना देखील आहे.