जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / दीपिकाची मॅनेजर करिष्माच्या घरावर छापा मारणारे NCB चे अधिकारी निलंबित

दीपिकाची मॅनेजर करिष्माच्या घरावर छापा मारणारे NCB चे अधिकारी निलंबित

दीपिकाची मॅनेजर करिष्माच्या घरावर छापा मारणारे NCB चे अधिकारी निलंबित

आश्चर्याची बाब म्हणजे, भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांच्या जामिनादरम्यान एनसीबीची टीम न्यायालयात हजर झाली नव्हती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 डिसेंबर : बॉलिवूड ड्रग्स प्रकरणाच्या (bollywood drug case) चौकशीत सहभागी असलेल्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ( Narcotics Control Bureau) दोन अधिकाऱ्यांना संशयास्पद भूमिकेसाठी निलंबित करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश विभागीय संचालकांनी दिले होते. एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तपास अधिकाऱ्यांपैकी एकाने अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या प्रकरणात सिक्युर बेलसाठी आणि आणखी एक तपास अधिकाऱ्याची कॉमेडियन भारती सिंगच्या (Bharti Singh) प्रकरणात संशयास्पद भूमिकेबद्दल निलंबित करण्यात आलं आहे. 2021 पासून खरेदी करता येणार नाही Samsung चा हा पॉप्युलर स्मार्टफोन? हे आहे कारण एनसीबीच्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात चौकशीसाठी आदेश देण्यात होते. आश्चर्याची बाब म्हणजे, भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांच्या जामिनादरम्यान एनसीबीची टीम न्यायालयात हजर झाली नव्हती. तसंच त्यांच्या जामिनाला विरोध देखील केला नव्हता. त्यानंतर हर्ष आणि भारती सिंग यांना जामीन मिळाला होता. या प्रकरणात एनसीबीने एनडीपीएस कोर्टाकडे अपील केले की खालच्या कोर्टाने दिलेला जामीन आणि भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांचा ड्रग्समध्ये असलेला सहभाग लक्षात घेवून त्यांचा जामीन रद्द करावा. या प्रकरणावर पुढील आठवड्यात सुनावणी आहे. या प्रसिद्ध महिला क्रिकेटपटूंनी समलैंगिक पार्टनरबरोबर थाटलाय संसार एनसीबीच्या छापा दरम्यान दीपिका पदुकोणच्या मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्या घरी ३ सीबीडी तेल आणि गांजा जप्त करण्यात आला, त्यानंतर अटक टाळण्यासाठी तिने अटकपूर्व जामिनाकरता अर्ज केला होता. तिचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून ती सध्या जामिनावर बाहेर आहे. याही प्रकरणात तपास अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आढळली आली असून विभागीय संचालक समिर वानखेडे यांनी दिलेल्या आदेशानुसार दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात