मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्ती-शोविकसह इतरांवर NCB ने दाखल केले आरोप, 'या' तारखेला होणार सुनावणी

Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्ती-शोविकसह इतरांवर NCB ने दाखल केले आरोप, 'या' तारखेला होणार सुनावणी

सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर उघडकीस आलेल्या ड्रग्स प्रकरणात सुमारे दोन वर्षांनी मुंबईतील विशेष न्यायालयात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अभिनेत्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), भाऊ शोविक चक्रवर्ती आणि इतर काहीजणांवर आरोप दाखल केला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 23 जून- सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर उघडकीस आलेल्या ड्रग्स प्रकरणात सुमारे दोन वर्षांनी मुंबईतील विशेष न्यायालयात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अभिनेत्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), भाऊ शोविक चक्रवर्ती आणि इतर काहीजणांवर आरोप दाखल केला आहे. 12 जुलै रोजी या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान न्यायालयाने अद्यापही रियावर आरोप निश्चित केलेले नाहीत.

PTI च्या वृत्तानुसार, विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी सांगितलं की, त्यांच्या वतीने सर्व आरोपींविरोधात न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केलेले सर्व आरोप कायम ठेवले आहेत. त्याचा उल्लेख न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्र करण्यात आला आहे. त्यांनी रिया आणि शोविकवर अमली पदार्थांचं सेवन तसेच मृत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसाठी अशा पदार्थांची खरेदी आणि पैसे देण्याचे आरोप निश्चित करण्याची विनंती केली आहे.NCB ने आरोपींवर कलम 8(c) 20(b)(ii)(a), 22, 27, 27A, 28, 29, आणि 30 नुसार अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांसह विविध आरोप केले आहेत.

नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्याशी संबंधित खटल्यांची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश व्ही.जी. रघुवंशी यांनी 12 जुलै ही सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. अतुल सरपांडे यांनी सांगितले की, न्यायालय सर्व आरोपींवर आरोप निश्चित करणार होतं. मात्र, काही आरोपींनी दोषमुक्तीचे अर्ज दाखल केल्याने तसे होऊ शकले नाही. त्यांनी सांगितले की, दोषमुक्तीच्या अर्जावर निर्णय झाल्यानंतरच आरोप निश्चित केले जातील, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

First published:

Tags: Bollywood News, Drugs, Entertainment, NCB, Rhea chakraborty, Sushant sing rajput