मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कुटुंबात पुन्हा वाद; पत्नीचे सासूवर गंभीर आरोप, म्हणाली 'माझं अन्नपाणी बंद...'

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कुटुंबात पुन्हा वाद; पत्नीचे सासूवर गंभीर आरोप, म्हणाली 'माझं अन्नपाणी बंद...'

नवाजुद्दीन सिद्दीकी

नवाजुद्दीन सिद्दीकी

काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनच्या आईने त्याच्या पत्नीविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. त्यांनंतर आता अभिनेत्याच्या पत्नीने आपल्या सासूवर गंभीर आरोप करत सर्वांनाच धक्का दिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 29 जानेवारी-   बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. अभिनेता नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधत असतो. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आपल्या 'हड्डी' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत होता. या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झाल्यापासून नवाजुद्दीनचं कौतुक होत आहे. यामध्ये त्याने ट्रान्स जेंडरची भूमिका साकारली आहे.परंतु आता नवाजुद्दीन एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनच्या आईने त्याच्या पत्नीविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. त्यांनंतर आता अभिनेत्याच्या पत्नीने आपल्या सासूवर गंभीर आरोप करत सर्वांनाच धक्का दिला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीची आई आणि त्याची पत्नी यांच्यामध्ये वाद सुरु आहे. याच कारणामुळे अभिनेत्याच्या आईनेही त्याची पत्नी म्हणजेच आपल्या सुनेविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. परंतु आता अभिनेत्याची पत्नी आलियानेही अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आलियाने सांगितलं की, तिला घरात खूप समस्या येत आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, तिच्याच घरात तिचं अन्नपाणी बंद करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर तिला स्वयंपाकघरात जाण्याची परवानगी नाही. आपल्याला सोफ्यावर झोपावं लागत असल्याचंही आलियाने म्हटलं आहे.

(हे वाचा: Nawazuddin Siddiqui: मला 25 कोटींची ऑफर दिली, तरी 'तसं' काम परत नको', नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं वक्तव्य)

ई टाईम्सच्या रिपोर्टनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने आरोप करत म्हटलं आहे की, तिला नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. तिला घराबाहेर पडू दिल जात नाही. तसेच तिला आपल्याच घराच्या स्वयंपाकघरात प्रवेश दिला जात नाही. तिला बाहेरच्या खोलीत अन्नपाणी दिलं जातं पण आत येऊ दिल जात नाहीय. या सर्व गोष्टींची तिला खूप भीती वाटत असल्याचंही तिने म्हटलं आहे. आलियाच्या मते परिस्थिती अशी आहे की, तिला लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावर झोपाव लागतं. ती पुढे म्हणते तिने याबाबत अद्याप पोलिसांत तक्रार केलेली नाहीय. मात्र आपल्या वकिलाला सर्व प्रकार सांगितलेला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवाजुद्दीनची आई मेहरुनिसा सिद्दीकी आणि आलिया यांच्यात संपत्तीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मतभेद सुरु आहेत. परंतु आलिया जेव्हा नवाजुद्दीनच्या अंधेरीतील आलिशान बंगल्यात राहायला परतली तेव्हा हे प्रकरण अधिक वाढलं.

रिपोर्ट्सनुसार, नवाजच्या आईला आलिया घरात परतलेलं अजिबात रुचलं नाही आणि याबाबत त्यांनी मुंबईच्या वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये आपल्या सुनेविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.

First published:

Tags: Bollywood actor, Entertainment