मुंबई, 09 ऑक्टोबर : कौन बनेगा करोडपतीचा नवा सीझन (Kaun Baneka Crorepati Season 12) सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्साह आहे. अमिताभ बच्चन यांना स्क्रीनवर पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद होत आहे. दर शुक्रवारी या कार्यक्रमामध्ये ‘करमवीर’ स्पेशल एपिसोड असतो. या एपिसोडमध्ये समाज कल्याणासाठी काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा किंवा फाऊंडेशनचा सन्मान केला जातो. त्यांच्याबरोबर केबीसीचा हा खेळ खेळला जातो. हा खेळ खेळल्यानंतर मिळणारे पैसे समाजकार्यासाठी त्या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून वापरले जावे, असा या भागाचा उद्देश्य आहे. या शुक्रवारी असणाऱ्या करमवीर’ स्पेशल एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन मोहन फाऊंडेशनचे (Mohan Foundation) संस्थापक आणि मॅनेजिंग ट्रस्टी डॉ सुनील श्रॉफ यांचे स्वागत करतील. मोहन फाऊंडेशन गेली 2 दशकं अवयव दानासंदर्भात काम करत आहे. श्रॉफ यांच्याबरोबर सेलिब्रिटी गेस्ट म्हणून अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) असणार आहे. रितेश आणि त्याची पत्नी जेनिलिया देशमुख यांनी देखील सोशल मीडियावर जाहीर केले होते, उभयतांनी अवयव दान करण्याची शपथ घेतली आहे.
दरम्यान केबीसीच्या या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणेच या प्रोमोवर देखील चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यावेळी डॉ. श्रॉफ यांनी मोहन फाऊंडेशनचे काम काय आहे, याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर लक्ष वेधून घेणारी आणखी एक गोष्ट म्हणजे रितेश देशमुखने त्याची वडील माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुखांचा उल्लेख. यामध्ये केबीसीने विलासराव आणि रितेशचा एक फोटो देखील शेअर केला आहे. जर त्यावेळी अवयव दान केले असते तर त्यावेळी वडिलांना वाचवता आले असते, याबाबत रितेशने भाष्य केले आहे. त्याने असे म्हटले आहे की, ‘गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या मनात होतं की काहीतरी केलं पाहिजे. जिवंतपणी मी माझ्या वडीलांसाठी काही करू शकलो नाही. त्यामुळे मी माझे शरीर तंदुरूस्त ठेवतो.’
The best gift one can give is the gift of life. This Friday, meet our #KBCKaramveer Dr Sunil Shroff, founder of MOHAN Foundation, an organization that has been championing the cause of organ donation. Watch him on the hotseat with our champion Ritesh Deshmukh in #KBC12 at 9PM. pic.twitter.com/aj0MVvv2Ou
— sonytv (@SonyTV) October 8, 2020
सध्या खूप कमी अवयव दाता असल्याचेही या एपिसोडमध्ये रितेश म्हणाला. अगदी गंभीर परिस्थिती असेल तरच एखादा रिसिपंट या यादीमध्ये वरच्या स्थानावर येतो असेही त्याने नमुद केले.
T 3675 - I am a pledged ORGAN DONOR .. I wear the green ribbon of its sanctity !!🙏 pic.twitter.com/EIxUJzkGU6
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 29, 2020
अभिनेता अमिताभ बच्चन यांनी देखील काही दिवसांपूर्वी अवयव दान करण्याची शपथ घेतली होती. त्यांनी देखील ट्वीट करून याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती.