जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने OTT प्लॅटफॉर्मला केले अलविदा, काय आहे कारण?

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने OTT प्लॅटफॉर्मला केले अलविदा, काय आहे कारण?

nawazuddin siddiqui

nawazuddin siddiqui

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने (nawazuddin siddiqui ) ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भात परखड मत व्यक्त करत ओटीटी प्लॅटफॉर्म सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 ऑक्टोबर: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) आपल्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखला जातो. बॉलिवूडबद्दल त्याची स्पष्ट मते तो व्यक्त करत असतो. आताही त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भात परखड मत व्यक्त करत ओटीटी प्लॅटफॉर्म (Nawazuddin Siddiqui quits OTT platforms) सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नेटफ्लिक्स, अमॅझॉन प्राईनसारख्या कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवाजुद्दीन सिद्दिकी आता दिसणार नाही. त्यामुळे बी टाऊनमध्ये त्याच्यावर चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नवाजने सेक्रेड गेम, सीरियस मॅन सारख्या हिट वेबसीरिजमध्ये आपली वेगळी छाप सोडली होती. दरम्यान, त्याने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत हा निर्णय जाहीर केला आहे. त्याने सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा धंदा झाला असल्याचे परखड मत यावेळी व्यक्त केले. तो म्हणाला, मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊससाठी ओटीटी प्लॅटफॉर्म धंदा झालाय. अनेक अनावश्यक शोसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘डंपिंग ग्राऊंड’ बनलंय. सध्या या ठिकाणी असे शो आहेत जे एकतर पाहण्याच्या लायकीचे नाहीत किंवा कशाचे तरी सिक्वल आहेत ज्यामध्ये नवं काहीच सांगण्यासारखं नाही. मी जेव्हा सेक्रेड गेमसाठी नेटफ्लिक्ससोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा खूप डिजीटल मीडियाविषयी खूप उत्सूकता आणि आव्हानं होती. नव्या लोकांना संधी दिली जात होती. मात्र, आता त्याचा ताजेपणा निघून गेला आहे. असे मत त्याने यावेळी व्यक्त केले.

….म्हणून OTT प्लॅटफॉर्मला अलविदा करण्याचा घेतला निर्णय

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म स्वतःला स्टार समजणाऱ्या अभिनेत्यांसाठी आणि मोठमोठ्या निर्मात्या कंपन्यांसाठी धंदा (रॅकेट) बनले आहे. बॉलीवूडमधील प्रमुख चित्रपट निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्व मोठ्या लोकांशी फायद्याचे करार केले आहेत. निर्मात्यांना अमर्यादीत कंटेंट तयार करण्यासाठी प्रचंड मोठी रक्कम मिळते. मात्र, अमर्यादीत कंटेंटने गुणवत्तेला मारलं आहे, असा आरोप नवाजुद्दीन सिद्दिकने यावेळी केला. तसेच, मला जर ओटीटी प्लॅटफॉर्मवरील शो पाहणंही शक्य होत नसेल तर मी त्यात कसं काम करू? या स्टार व्यवस्थेने मोठ्या पडद्याला खाऊन टाकलं. आता आमच्यासारखे तथाकथित OTT स्टार मोठ्या पैशाची मागणी करतात आणि बॉलीवूड ए-लिस्टर्ससारखे ताशेरे ओढतात. कंटेंट हाच निर्णायक आहे हे ते विसरले आहेत. स्टारचं राज्य असायचं तो काळ निघून गेला आहे. लॉकडाऊनच्या आणि डिजीटल मीडियाच्या प्रभावाआधी बॉलिवूडमधील ए लिस्टर त्यांचा चित्रपट देशभरातील ३,००० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करायचे. प्रेक्षकांना हे चित्रपट पाहण्याखेरीज कोणताच पर्याय उरायचा नाही. आता प्रेक्षकांना अनेक पर्याया खुले आहेत. अशी भावना त्याने यावेळी व्यक्त केली. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वर्कफ्रटबद्दला बोलायचे झाले तर, तो सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘अदभुत’ चे शुटिंग सुरु आहे. या चित्रपटात डायना पेंटी, श्रेया धन्वंतरी आणि रोहन मेहरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सब्बीर खान यांनी केले आहे. 2022 मध्ये प्रदर्शित होणारा ‘अदभुत’ हा चित्रपट सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया आणि सब्बीर खान फिल्म्स निर्मित आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात