Home /News /entertainment /

नवाजुद्दीन सिद्दीकी सोडणार भारत? पत्नी आलिया म्हणाली, ‘आम्ही...’

नवाजुद्दीन सिद्दीकी सोडणार भारत? पत्नी आलिया म्हणाली, ‘आम्ही...’

अष्टपैलू अभिनय शैलीसाठी प्रसिद्ध असलेला नवाज सध्या चित्रपटांपेक्षा आपल्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहू लागला आहे.

    मुंबई 2 ऑगस्ट: नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडिच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. अष्टपैलू अभिनय शैलीसाठी प्रसिद्ध असलेला नवाज सध्या चित्रपटांपेक्षा आपल्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहू लागला आहे. सध्या तो दुबईला जाण्याची तयारी करत आहे. (Nawazuddin Siddiqui Moving to Dubai) परिणामी नवाज भारत सोडून दुबईला सेटल होतोय की काय अशी चर्चा आहे. यापूर्वी देखील अनेक बॉलिवूड कलाकार दुबईला सेटल झाले. मात्र या चर्चेवर आता स्वत: नवाजची पत्नी आलियानं स्पष्टीकरण दिलं. तिने भारत सोडून दुबईला जाण्याचं कारण सांगितलं. पुन्हा याड लावलं! आर्चीचे मनमोहक फोटो पाहून चाहते झाले सैराट टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया म्हणाली की, “हे खरे आहे की, आम्ही दुबईला जात आहोत. दुबईला गेल्यानंतर, आमची दोन्ही मुले शोरा आणि यानी, आता तिथेच राहतील आणि पुढे शिक्षण देखील तिथेच घेतील. भारतात सध्या ऑनलाईन अभ्यास होत आहेत. आम्हाला वाटते की येत्या काही वर्षांसाठी हे असेच होणार आहे. ज्यामुळे आम्ही आमच्या मुलांना दुबईच्या शाळेत दाखल केले आहे. कारण ऑनलाईन अभ्यासादरम्यान वातावरण योग्य नाही आणि मुले नीट अभ्यास करू शकत नाहीत, वर्गातील शिक्षण पूर्णपणे वेगळे आहे. आम्हाला लवकरच दुबईला जाण्यासाठी तिकिटे मिळणार आहेत.” ‘ग्लॅमर की कपड्याची बचत?’ 2.0 लुकमुळे रश्मी देसाई ट्रोल यापूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकी मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेणाऱ्या कलाकारांवर भडकला होता. “ते लोक काय बोलणार आहेत? त्यांनी तर मालदीवचा तमाशा करून सोडलाय. मला माहित नाही त्यांची टुरिझम इंडस्ट्रीसोबत काय अरेंजमेंटस आहेत, मात्र या लोकांनी निदान माणुसकी म्हणून आपल्या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर न टाकता स्वतः पुरता मर्यादित ठेवावेत. देशात सर्व लोक अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोक खुपचं त्रस्त आहेत. अशामध्ये तुमच्या सुट्टीचे फोटो त्यांना दाखवून त्यांचा धीर खचू देऊ नका.” असं म्हणत नवाजने बॉलिवूड कलाकारांना सुनावलं होतं.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood actor

    पुढील बातम्या