रश्मी देसाई ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. छोट्या पडद्यावर सोज्वळ सुनेच्या रूपात झळकणाऱ्या रश्मीचे स्वत:चे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. मात्र तिचा हा 2.0 अवतार काही नेटकऱ्यांना आवडला नाही. त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली. ‘ग्लॅमर की कपड्याची बचत?’ असा सवाल करत काही ट्रोलर्स तिची खिल्ली उडवत आहेत.