मुंबई,3 जानेवारी- बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आज सिनेसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता बनला आहे. कार्तिकने आपल्या कूल अंदाजाने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. अभिनेत्याने फारच कमी वेळेत बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. कार्तिक आर्यन आपल्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त आपल्या खाजगी आयुष्यामुळेही प्रचंड चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवल्यापासून कार्तिक आर्यनचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं आहे. कार्तिक आर्यनचे अनेक ब्रेकअपस झाल्याचेही सांगितलं जातं. त्यातील बॉलिवूड नवाबची लेक अर्थातच अभिनेत्री सारा अली खानसोबतच कार्तिकचं नातं आणि ब्रेकअप दोन्ही प्रचंड चर्चेत आले होते. या दोघांनी अनेकवेळा एकमेकांना टाळल्याचे प्रसंगही पाहायला मिळाले होते. त्यांनंतरसुद्धा कार्तिक आर्यनने अनेक मुलींना डेट केल्याचं समोर आलं आहे.
काही महिन्यांपासून बॉलिवूड 'कूल बॉय' कार्तिक आर्यनचं नाव बॉलिवूड हँडसम हंक हृतिक रोशनच्या चुलत बहिणीसोबत जोडलं जात होतं. हृतिकची बहीण पश्मिना रोशन आणि कार्तिक आर्यन एकमेकांच्या प्रेमात असल्याचे अनेक वृत्त समोर आले होते. परंतु आता पुन्हा एकदा कार्तिक आर्यनचं नाव एका वेगळ्याच मुलीसोबत जोडलं जात आहे. कार्तिक आर्यनची ही मिस्ट्री गर्ल कोणतीही अभिनेत्री नसून ती एक डॉक्टर असल्याचं म्हटलं जात आहे. या सर्व चर्चेला कारणीभूत या दोघांची एक पोस्ट ठरलेली दिसत आहे.
कार्तिक आर्यन चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सध्या तो नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पॅरिसमध्ये आहे. याठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत केल्यानंतर कार्तिक काही कॉलीटी टाइम स्पेंड करत आहे. नुकतंच कार्तिक आर्यनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने ब्रेकफास्टच्या प्लेटचा फोटो दाखविला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे निहारिका ठाकूरनेसुद्धा अगदी हुबेहूब असाच फोटो शेअर केला आहे. या दोघांची पोस्ट पाहून या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजत असल्याचं म्हटलं जात आहे.
निहारिक ठाकूरबाबत सांगायचं झालं तर, ती लोकप्रिय गायक प्रतीक कुहडची एक्स गर्लफ्रेंड आहे. प्रतीक आणि निहारिका रिलेशनशिपमध्ये होते. त्या दोघांची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत असे. परंतु काही महिन्यांपूर्वी प्रतीकने आपण निहारिका ठाकूरपासून विभक्त झाल्याचं सांगत सर्वांनाच चकित केलं होतं.त्यांनंतर आता निहारिक ठाकूर कार्तिक आर्यनला डेट करत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या पोस्टने चर्चेला उधाण आलं आहे.
कार्तिक आणि निहारिकाच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर युजर्स प्रचंड कमेंट्स करत आहेत. काहींनी कमेंट्स करत लिहलंय, 'कार्तिकचे आई वडील आणि बहीण तिघेही डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांनीच डॉक्टर असणाऱ्या निहारिकासोबत कार्तिकची डेट फिक्स केली असावी'. तर काहींनी लिहलंय कार्तिकची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सारा अली खानसुद्धा सध्या लंडनमध्येच आहे. म्हणजे सारा आणि कार्तिक तर पुन्हा एकत्र आले नसतील?' अशाप्रकारे युजर्स अनेक संदर्भ जोडत आहेत. मात्र सत्य काय आहे हे अधिकृतपणे कार्तिक कधी सांगेल त्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Kartik aryan