जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Haddi : हड्डी' सिनेमाचा फर्स्ट लुक आऊट; प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्याला ओळखणं झालं कठीण

Haddi : हड्डी' सिनेमाचा फर्स्ट लुक आऊट; प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्याला ओळखणं झालं कठीण

Haddi : हड्डी' सिनेमाचा फर्स्ट लुक आऊट;  प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्याला ओळखणं झालं कठीण

‘हुड्डा’ या नव्या सिनेमाचा फर्स्ट लुक समोर आला असून सिनेमात लेडी बॉसच्या रुपात दिसत असलेल्या अभिनेत्याला ओळखणंही कठीण झालं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,  23 ऑगस्ट: बॉलिवूड सिनेमात चॅलेंजिंग आणि युनिक भूमिकांसाठी ओळखला जाणारा सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्धिकी. अनेक महिन्यांनंतर अभिनेता त्याचा नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हड्डी या सिनेमाची प्रेक्षक अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर आज सिनेमाचा पहिला लुक प्रदर्शित झाला आहे. सिनेमातील नवाजुद्दीन सिद्धिकीचा लुक पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.  सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये नवाज ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. त्याचा हा आगळा वेगळा लुक पाहून प्रेक्षक हैराण झालेत. नवाजुद्दीन सिद्धिकीला या लुकमुळे ओळखणंही कठीण झालं आहे. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा नवाजुद्दीनचा लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्या लुकची सर्वत्र चर्चा सुरू आहे त्या ‘हुड्डा’ सिनेमाविषयी सांगायचं झालं तर हा सिनेमात रिवेंज ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  नवाजुद्दीन सिद्धिकी सिनेमात प्रमुख भूमिकेत असणार आहे.  ग्रे कलरच्या काश्मिरी गाऊनमध्ये ग्लोइंग बोल्ड मेकअप आणि स्टायलिश हेअर स्टाइलमुळे लेडी बॉसच्या वेशात बसलेल्या नवाजुद्दीनला ओळखणं कठीण झालं आहे. हेही वाचा - Yuzvendra chahal and Dhanashree Verma : घटस्फोटाच्या चर्चानंतर चहलची पत्नी निघाली माहेरी; व्हिडीओ तुफान व्हायरल

जाहिरात

हड्डी या सिनेमाचा फर्स्ट लुक पाहूनच सिनेमा थ्रिलर असणार हे समोर आलं आहे. नवाजुद्दीनच्या हातातील तलवार आणि त्याला लागलेलं रक्त पाहून सिनेमात नक्कीच क्राइम स्टोरी पाहायला मिळेल असं वाटत आहे.  सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर करत नवाजुद्दीन खास पोस्टही लिहिली आहे. नवाजुद्दीनं म्हटलंय, ‘मी आजवर अनेक वेगवेगळ्या आणि इंटरेस्टिंग भूमिका केल्या आहेत. मात्र हड्डीमधील माझी भूमिका ही सगळ्यात युनिक आणि स्पेशल आहे. तुम्ही मला कधीच या अवतारात पाहिलेलं नाही. मला एक अभिनेता म्हणून पुढे जाण्यासाठी ही भूमिका महत्त्वाची भूमिका निभावणार आहे’. हुड्डा सिनेमाचं शेवटच्या टप्प्यातील शुटींग सध्या सुरू आहे. सिनेमाविषयी आजवर कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. केवळ नवाजुद्दीनचा नवा सिनेमा येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर सिनेमाचा फर्स्ट लुक समोर आला असून सिनेमा 2023मध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात