मुंबई, 28 सप्टेंबर : पंजाबमध्ये राजकीय नाट्य अजूनही सुरूच आहे. नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu Resigns) यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचलं होतं. पण आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली आहे. सिद्धूंनी आपला राजीनामा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्याकडे पाठवला आहे. राजीनामा नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिला आहे मात्र अर्चना पूरन सिंह (Archana Puran Singh) यांचे नाव सोशल मीडियावर चर्चेत आल्याचे चित्र सध्या सोशल मीडियावर दिसत आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर अर्चना पूरन सिंह यांची खुर्ची धोक्यात अल्याची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. 'द कपिल शर्मा शो'ची परीक्षक म्हणून सध्या अर्चना पूरन सिंह काम पाहत आहेत. मात्र यापूर्वी नवज्योत सिंग सिद्धू या शोचे परीक्षक म्हणून काम पाहत होते. परंतु शोमध्ये पाकिस्तानबद्दल त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला, ज्यामुळे त्यांना हा शो सोडावा लागला. यानंतर, शोमध्ये त्यांच्या जागी अर्चना पूरन सिंह यांची परीक्षक म्हणून वर्णी लागली.
आता सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर अशा पोस्टचा सोशल मीडियावर पूरच आला आहे. ज्यामध्ये त्यांची खिल्ली उडवत आहेत आणि ट्रोल करत आहेत.
हे वाचा - 'दबंग गर्ल'चा ग्लॅमरस अंदाज; पाहा सोनाक्षी सिन्हाचं नवं PHOTOSHOOT
नेटकरी अर्चनाचा फोटो शेअर करत सिद्धू यांच्यावर टीका करत आहेत. ट्वीटरवर अशा अनेक पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत, ज्यात सिद्धू यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, 'सिद्धूचा राजीनामा अन धोक्यात आली अर्चना पूरन सिंह यांची खुर्ची .' दुसरा नेटकरी म्हणतो की, 'राहुल गांधींपेक्षा सध्या जास्त तणावात अर्चना पूरन सिंह या आहेत.' तिसरा नेटकरी म्हणतो की, 'नवज्योत सिंग यांच्या राजीनाम्यानंतर, सर्वात जास्त अस्वस्थ कोण असेल तर ती द कपिल शर्मा शोमधील अर्चना पूरन सिंह आहे. 'एका नेटकऱ्याने फोटो शेअर करत म्हटले आहे की, करियर अडचणीत आहे ?. असे अनेक मीम्स शेअर करून लोकांनी सिद्धू आणि अर्चना यांचे फोटो शेअर करत खिल्ली उडवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment