मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Nava Gadi Nava Rajya Maha Episode : रमाची खरी ओळख आली समोर; सवतीचं भुत पाहून आनंदी होणार वेडी?

Nava Gadi Nava Rajya Maha Episode : रमाची खरी ओळख आली समोर; सवतीचं भुत पाहून आनंदी होणार वेडी?

नवा गडी नवं राज्य

नवा गडी नवं राज्य

नवा गडी नवं राज्य मालिकेत सर्वपित्र अमावस्येनिमित्त महाएपिसोड रंगणार आहे. सवतीचं भुत आपल्याशी बोलतं हे आनंदीला कळणार आहे.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 23 सप्टेंबर : झी मराठीवरील नवा गडी नवं राज्य ही मालिका प्रेक्षकांना आवडू लागली आहे. मध्यंतरी दाखवण्यात आलेल्या काही सीनमुळे प्रेक्षाकांनी मालिकेला ट्रोल केलं होतं पण मालिकेचं कथानक जस पुढे सरकत चाललं आहे तशी मालिकेची रंजकता वाढत चालली आहे. आपण पाहिलं तर आनंदी लग्न करून आपल्यापासून नव्या घरात रमानं कोलते वहिनी बनून तिची भरपूर मदत केली. प्रसंगी आनंदीला तोंडावर पाडण्यासाठी रमानं कटकारस्थानही केली.  पण अजूनपर्यंत रमा ही आनंदीची सवत म्हणजे राघवची पहिली बायको असल्याचं काही रमानं आनंदीला सांगितलेलं नाही. पण अखेर रमाचं खरं रूप आनंदीसमोर येणार आहे. येत्या सर्वपित्री अमावस्येला रमाचं खरं रुप आनंदीसमोर येणार आहे. मागच्या भागात आपण पाहिलं की, रमा म्हणजेच कोलते वहिनी आणि आनंदीचं भांडण होत आणि आनंदी कोलते वहिनींना चांगलेच खडे बोल सुनावते. तेव्हा रमा तिला तू स्वत: मला औक्षण करून घरात घेशील असं म्हणते. तर दुसरीकडे राघव रमाची तस्बीर बनवण्यासाठी अनेकांना भेटत असतो.  अखेर रमाचं सुंदर स्केच राघव सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी घरात घेऊन येतो. हेही वाचा - Sukh Mhanje Nakki Kay Asata : 'एकदाच तिला मारून टाका आणि...'; गौरीचं Accident पाहून प्रेक्षक वैतागले येत्या रविवारी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी नवा गडी नवं राज्य मालिकेत महाएपिसोड रंगणार आहे. ज्यात घरात वाडी ठेवण्याचा कार्यक्रम सुरू असतो. प्रोमोमध्ये दाखवल्या प्रमाणे घरात अनेक पाहुणे आलेले असतात. तितक्यात राघव रमाची तस्बीर घेऊन येतो. चिंगी आनंदीला घाईघाईनं हॉलमध्ये घेऊन येते. तेव्हा रमाची तस्बीर पाहून आनंदीला धक्का बसतो.
आपण ज्या कोलते वहिनींना भेटत होतो तीच आपली खरी सवत आहे हे रमाच्या लक्षात येतं. रमा देखील मोठ्या तोऱ्यात आनंदीला खडे बोल सुनावते. कोलते वहिनी आपली सवत आहे इतकंच नाही आपली मेलेली सवत फक्त आपल्यालाच दिसते. सवतीचं भुत आपल्या मानगुटीवर बसेल अशी भिती रमाला वाटते. या सगळ्यातून रमा स्वत:ला सावरू शकेल का. मेलेली रमा मला दिसते हे ती सर्वांना पटवून देऊ शकेल का? की सवतीचं भुत पाहून रमाला वेड लागेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मालिकेच्या महाएपिसोडमध्ये मिळणार आहेत.
First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

पुढील बातम्या