मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

महाराष्ट्रातील या गावाचं नाव आता 'हिरोची वाडी', इरफानच्या प्रेमाखातर गावकऱ्यांचा निर्णय

महाराष्ट्रातील या गावाचं नाव आता 'हिरोची वाडी', इरफानच्या प्रेमाखातर गावकऱ्यांचा निर्णय

कॅन्सरमुळे निधन झालेला इरफान खान हा पहिलाच अभिनेता नाही. कॅन्सरमुळे बॉलिवूडनं या आधीही बरेच कलाकार गमावले आहेत.

कॅन्सरमुळे निधन झालेला इरफान खान हा पहिलाच अभिनेता नाही. कॅन्सरमुळे बॉलिवूडनं या आधीही बरेच कलाकार गमावले आहेत.

नाशिकमधील एका छोट्याशा गावाने 'इरफान खान'ची आठवण अबाधित राहावी याकरता मोठा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नाशिक 11 मे : काही माणसं अशी असतात की ज्यांच्या नसण्याने फक्त त्यांंच्या कुटुंबालाच नाही तर आजुबाजुच्या समाजालाही फरक पडतो. त्यांच्या अकाली जाण्याने समाजामध्ये एक पोकळी निर्माण होते. अभिनेता 'इरफान खान' (Irrfan Khanच्या जाण्याने तर न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आजही त्याच्या आपल्यातून जाण्याची जखम ताजी असल्यासारखं वाटतं. इरफानच्या जाण्याने त्याच्या चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं, प्रत्येकाला शक्य अशा प्लॅटफॉर्मवरून त्याला मानवंदना दिली. मात्र नाशिकमधील एका छोट्याशा गावाने 'इरफान खान'ची आठवण अबाधित राहावी याकरता मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार या गावकऱ्यांनी गावाला इरफानचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. इगतपुरी तालुक्यात त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी इरफान खानचे एक फार्महाऊस आहे. पत्र्याचा पाडा याठिकाणचे रहिवासी इरफानबाबतच्या अनेक आठवणी सांगतात. इरफा इगतपुरी तालुका तसा निसर्गाने नटलेला तालुका आहे. इरफानचं फार्महाऊस देखील याठिकाणी दिमाखात उभं आहे.

(हे वाचा-VIDEO: कोरोनाविरोधात 9 देशातील 17 कलाकार एकत्र, भारतीय संगीतातून शांतीचा संदेश

इरफान 'देवमाणूस' होता असं देखील इथले गावकरी मोठ्या अभिमानाने सांगतात. त्यामुळे आता या गावाचं नाव 'हिरोची वाडी' असं करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. केवळ इरफान खानप्रती असणाऱ्या प्रेमाखातर गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. कारणे गेल्या 5 वर्षांमध्ये इरफानबरोबर या गावकऱ्यांचे एक नाते विकसीत झाले आहे. इरफान याठिकाणच्या पत्र्याच्या पाडा जिल्हा परिषद शाळेसाठी देखील मदत करायचा. तिथल्या मुलांशी संवाद साधायचा.  अमेरिकेत उपचार घेत असताना देखील इरफानने हे संबंध जपले होते. त्याने त्याच्या नातेवाईंकाच्या मदतीने पत्र्याचा पाडा शाळेसाठी मदत पाठवली होती. तर या गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार देखील इरफानच्या हस्ते मिळाला होता.

(हे वाचा-'थोडी इज्जत दिखा, एक सॅल्यूट तो मार' जितेंद्र जोशीचं वॉरियर्ससाठी दमदार रॅप साँग)

इरफानच्या तशा अनेक आठवणी प्रत्येकजण जपण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी त्याच्याबरोबर थेट आठवणी नसल्या तरीही त्याच्या सिनेमांच्या, त्याच्या कलाकृतींच्या माध्यमातून अनेकजण त्यांची ठेव जपत आहेत. अशावेळी इगतपुरी जवळील या गावाचे विशेष कौतुक होत आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: