'थोड़ी इज्जत दिखा... एक सॅल्यूट तो मार...' जितेंद्र जोशीचं कोरोना वॉरियर्ससाठी दमदार रॅप साँग; तुम्ही ऐकलं का?

'थोड़ी इज्जत दिखा... एक सॅल्यूट तो मार...' जितेंद्र जोशीचं कोरोना वॉरियर्ससाठी दमदार रॅप साँग; तुम्ही ऐकलं का?

सध्याच्या परिस्थितीतलं पोलिसांचं कार्य पाहून जितेंद्र जोशीनं या सर्व पोलिसांना अनोख्या अंदाजात त्यांच्या कामाला सॅल्यूट केला आहे.

  • Share this:

मुंबई,  11 मे : सध्या कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आलं असलं तर देश सेवा पोलिसांसाठी मात्र ड्युटी चुकलेली नाही. आज सर्वजण घरी राहत असले तरी आपल्या देशाचे खरे हिरो मात्र आपलं घरदार, कुटुंब, पत्नी-मुलं हे सर्व सोडून देशाची सेवा करताना दिसत आहे. अनेकांना मागच्या बऱ्याच दिवसांपासून घरी जायला किंवा त्यांच्या कुटुंबाला भेटायला मिळालं नाही. पण तरीही अशा परिस्थिती हे हिरो आपल्या सर्वांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपली सेवा बजावत आहेत. अशा सर्वांना सॅल्यूट करत अभिनेता जितेंद्र जोशीनं एक दमदार रॅप साँग गायलं आहे.

जितेंद्र जोशीच्या युट्यूब चॅनेवर नुकतंच हे रॅप साँग रिलीज करण्यात आलं आहे. ज्यात सध्या कोरोनामुळे झालेल्या देशातल्या परिस्थितीचं चित्रण करण्यात आलं आहे. नेहमीच पोलिसांवर टीका केली जाते. त्यांच्यावर अनेक प्रश्न केले जातात मात्र आज हेच योद्धे आपली सेवा कोणतीही तक्रार न करता किंवा आपल्याला सुद्धा मागे कुटुंब आहे या कशाचाच विचार न करता पार पाडताना दिसत आहेत.

सध्याच्या परिस्थितीतलं पोलिसांचं कार्य पाहून जितेंद्र जोशीनं या सर्व पोलिसांना अनोख्या अंदाजात त्यांच्या कामाला सॅल्यूट केला आहे. या गाण्यात पोलिसांच्या या कार्याचं कौतु करण्यात आलं आहे. यासोबतच जितेंद्रने पोलिसांचा नेहमीच आदर करण्याचं आवाहन या गाण्यातून केला आहे. सध्या जितेंद्रचं हे गाणं सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

First Published: May 11, 2020 03:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading