मुंबई 8 जुलै**:** बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांना प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता एक आठवड्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नसिरुद्दीन यांचा मुलगा विवान शाह (Vivan Shah) याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली. नसिरुद्दीन शाह यांना निमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना त्याच्या फुफ्फुसात पॅच असल्याचे आढळले. नसिरुद्दीन शाह यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची पत्नी रत्ना पाठक आणि मुलगा विवान त्यांच्या सोबत होते. नसिरुद्दीन शाह यांनी रुग्णालयात योग्य उपचार घेऊन ते आता सुखरुप घरी परतले आहेत. तारक मेहतांचे खरे बापुजी आहेत Chainsmoker; चंपकलाल गडांना हातात लागते सिगरेट
पतीच्या निधनाची बातमी कळताच सायरा बानोंनी उच्चारला ‘हा’ शब्द; म्हणाल्या… लक्षवेधी बाब म्हणजे ज्या दिवशी नसिरुद्दीन शाह यांना मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच दिवशी अभिनेते दिलीप कुमार यांना देखील दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज दिलीप कुमार यांचं दु:ख निधन झालं. शिवाय गेल्या वर्षभरात चाहत्यांनी बॉलिवूडमधील अनेक नामांकित कलाकार गमावले आहेत. या पार्श्वभूमीवर नसिरुद्दीन यांनी लवकरात लवकर तंदुरुस्त होऊन घरी यावं यासाठी चाहते प्रार्थना करत होते. अखेर त्यांच्या प्रार्थनेला यश मिळालं. ते बरे होऊन घरी परतले आहेत.

)







