मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

तारक मेहतांचे खरे बापुजी आहेत Chainsmoker; चंपकलाल गडांना हातात लागते सिगरेट

तारक मेहतांचे खरे बापुजी आहेत Chainsmoker; चंपकलाल गडांना हातात लागते सिगरेट

इतरांना व्यसनापासून दूर राहण्यास सांगणारे बापुजी खरं तर चेनस्मोकर आहेत. त्यांना सिगरेटचं प्रचंड व्यसन आहे. सिगरेट घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 8 जुलै: तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. गेली 13 वर्ष ही मालिका सातत्यानं लोकांचं मनोरंजन करत आहे. यावरुनच या मालिकेच्या लोकप्रियतेचा अंदाज आपल्याला येतो. या मालिकेनं मिळवलेल्या यशात अभिनेता अमित भट (Amit Bhatt) याचा सिंहाचा वाटा आहे. त्यानं मालिकेत साकारलेली चंपकलाल गडा (Champaklal Jayantilal Gada) उर्फ बापुजी ही व्यक्तिरेखा तुफान गाजली. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल मालिकेत कुठल्याही प्रकारचं व्यसन नसलेले आणि इतरांना व्यसनापासून दूर राहण्यास सांगणारे बापुजी खरं तर चेनस्मोकर आहेत. त्यांना सिगरेटचं प्रचंड व्यसन आहे. सिगरेट घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही.

मीरा चोप्राचे चित्रपट का झाले फ्लॉप? प्रियांकावर केला होता करिअर संपवल्याचा आरोप

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रसिद्ध लेखक तारक मेहता यांच्या कथांवर आधारित आहे. एका गुजराती वर्तमानपत्रात 'दुनिया नूं ऊंधा चश्मा' या नावाचा एक कॉलम ते लिहायचे. जेठालाल, दयाबेन, बापुजी, टप्पू ही त्यामधीलच पात्र आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे तारक मेहता यांनी रंगवलेले बापुजी चेन स्मोकर होते. ते सतत सिगरेटचं व्यसन करायचे. परंतु आसित मोदी यांनी मात्र मालिकेत त्यांची ती सवय दाखवली नाही. उलट व्यसनापासून दूर राहण्यासाठी बापुजी कशा प्रकारे लोकांना प्रेरित करतात याचं चित्रण केलं. अर्थात या आदर्षवादी इमेजमुळेच चंपकलाल गडा ही व्यक्तिरेखा आज तुफान गाजताना दिसत आहे.

First published:

Tags: Comedy actor, Taarak mehta ka ooltah chashma