जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / लग्नादिवशीच पतीला देशातून बाहेर काढलं गेलं, रजिस्टर ऑफिसमध्ये वाट पाहत राहिली गायिका

लग्नादिवशीच पतीला देशातून बाहेर काढलं गेलं, रजिस्टर ऑफिसमध्ये वाट पाहत राहिली गायिका

लग्नादिवशीच पतीला देशातून बाहेर काढलं गेलं, रजिस्टर ऑफिसमध्ये वाट पाहत राहिली गायिका

मोनाली म्हणाली, एकीकडे त्या व्यक्तीचं लग्न होतं आणि दुसरीकडे त्याला दिवसभर एअरपोर्टवर कैद्याप्रमाणे पकडून ठेवण्यात आलं होतं

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जून : बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी देणारी गायिका मोनाली ठाकूरनं काही दिवसांपूर्वीच गुपचूप उरकलेल्या लग्नाचा खुलासा केला. पण कशाप्रकारे तिच्या पतीला लग्नाच्या दिवशीच देशातून बाहेर काढण्यात आलं होतं हे मात्र त्यावेळी तिनं या गोष्टीबद्दल सांगितलं नव्हतं. लग्नाच्या दिवशी तिच्या पतीला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे ताब्यात घेतलं गेलं होतं आणि मोनाली रजिस्टर ऑफिसमध्ये बसून त्याची वाट पाहत होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोनालीनं हा संपूर्ण किस्सा सर्वांशी शेअर केला. मोनाली ठाकूरनं 2017 मध्ये बॉयफ्रेंड माइक रिचरशी लग्न केलं. पण लग्नाच्या दिवशी माइकला एअरपोर्टवर थांबवून ठेवण्यात आलं होतं. त्याच्याकडे वैध व्हिसा नव्हता. मोनालीनं दिलेल्या माहितीनुसार कोणीतरी त्याला सांगितली की भारतात जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही. त्याच्याकडे जर्मन पासपोर्ट होता. तो सरळ उठला आणि लग्नासाठी भारतात पोहोचला. इथे पोहोचल्यावर जेव्हा त्याला इथे आल्यावर व्हिसा विचारण्यात आलं तेव्हा त्याच्याकडे व्हिसा नव्हता. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलं. अरेच्चा! हात न टेकवता PUSH UPS; कतरिनाने हे केलं तरी कसं? पाहा व्हिडीओ

जाहिरात

मोनाली म्हणाली, एकीकडे त्या व्यक्तीचं लग्न होतं आणि दुसरीकडे त्याला दिवसभर एअरपोर्टवर कैद्याप्रमाणे पकडून ठेवण्यात आलं होतं आणि मग एका फ्लाइटने त्याच्या देशात परत पाठवण्यात आलं. पण एवढं सर्व होऊनही त्यांचं लग्न मात्र त्याच दिवशी झालं. मोनालीनं त्यावेळी भारत सरकारकडे मदत मागितली. संपूर्ण प्रकारण समजून घेतल्यानंतर सरकार आणि गृहमंत्रालयाने तिला कुटुंबाप्रमाणे मदत केली. अबुधाबीला पोहोचलेल्या माइकला पुन्हा भारतात बोलवण्यात आलं आणि मोनालीशी त्याचं लग्न लावून देण्यात आलं. अनलॉक 1 मध्ये बॉयफ्रेंडसोबत बाइकवरून फिरताना दिसली श्रद्धा कपूर, Video Viral

माइक रिचरसोबतच्या आपल्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना मोनाली म्हणाली, आम्ही दोघं पहिल्यांदा स्वत्झर्लंडमध्ये भेटलो होतो. नंतर आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो. त्याच्या कुटुंबीयांशी सुद्धा माझं चांगलं बॉन्डिंग होतं. नंतर 2016 च्या ख्रिसमसला माइकनं मला प्रपोज केलं. कोरोना पॉझिटिव्ह असूनही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री मोहिना कुमारी परतली घरी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood
  • First Published :
जाहिरात
जाहिरात