जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रतीक्षा संपली, 'Jhund 'ची डेट release; बिग बी Amitabh Bachchan यांनी शेअर केली पोस्ट

प्रतीक्षा संपली, 'Jhund 'ची डेट release; बिग बी Amitabh Bachchan यांनी शेअर केली पोस्ट

Jhund movie

Jhund movie

मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित आणि ‘बिग बी’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित झुंड (Jhund movie) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी पोस्ट करत डेट रिलीज केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 फेब्रुवारी: मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित आणि ‘बिग बी’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित झुंड (Jhund movie) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी पोस्ट करत डेट रिलीज केली आहे. झुंड या चित्रपटात अमिताभ बच्चन हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 4 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘आमची टीम तुम्हाला भेटायला येत आहे. झुंड चार मार्चला होणार प्रदर्शित’ अशे बच्चन यांनी आपल्या इंस्टा पोस्टमध्ये म्हटले आहे.

जाहिरात

गेल्या वर्षी 18 जूनला प्रदर्शित होणार होता last year 18 june release date विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. सभोवतालीच्या गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांना तयार करून त्यांनी आपली अशी फुटबॉल संघ बनवला होता. याच एकंदर कथानकावर ‘झुंड’ हा चित्रपट आधारित असणार आहे. गेल्या वर्षी 18 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता पण नंतर या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. सत्य घटनेवर आधारित सिनेमा Movie based on real events बिग बी अमिताभ बच्चन हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा शिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. सत्यकथेवर आधारित हा सिनेमा आहे. नागराज मंजुळेने या सिनेमाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी सुमारे दोन वर्ष वेळ घेतला. बिग बी अमिताभ बच्चन यांना नजरेसमोर ठेवूनच नागराजने ही स्क्रीप्ट लिहिली. ज्या विजय बारसेंवर झुंड हा सिनेमा आधारित आहे, त्यांनी अनेक मुलांचे आयुष्य बदलून टाकले. विजय बारसे एका कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक होते. निवृत्तीनंतर त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण दिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात