नागपूर, 05 मार्च : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणारी (Big B Amitabh Bachchan) यांची झुंड (Jhund film) फिल्म रिलीज झाली आहे. ही फिल्म प्रेक्षकांसह समीक्षकांच्याही पसंतीस उतरली आहे. या फिल्ममध्ये अमिताभ फुटबॉल केच विजय बारसे (Vijay Barse) यांची भूमिका साकारत आहेत. पण हे या फिल्ममध्ये अमिताभ जो विजय साकारत आहे तो विजय म्हणजे झुंडचा रिअल हिरो कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? विजय बारसे नागपूरच्या हिस्लोप कॉलेजमध्ये स्पोर्ट्स टिचर होते. त्यांनी भारतात स्लम सॉकर (Slum soccer) सुरू केलं, जे आज खूप प्रसिद्ध आहे. आमिर खान होस्ट करत असलेल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमातील एका एपिसोडमध्येही विजय दिसले होते. या कार्यक्रमात त्यांनी आपला प्रवास सांगितला होता. नागपूरमध्ये स्पोर्ट्स टिचर असताना त्यांनी एकदा काही मुलांना पावसात तुटलेल्या बादलीला किक मारत खेळताना पाहिलं, त्यांनी या मुलांना फुटबॉल दिला. यानंतर त्यांनी अशाच आणखी काही मुलांच्या ग्रुपला टेनिस बॉलला किक मारताना पाहिलं. त्यानंतर विजय यांनी अशा मुलांसाठी स्लम सॉकर सुरू केलं. ज्याला झोपडपट्टी फुटबॉल असं म्हटलं जातं. हे वाचा - ‘अमिताभ बच्चन यांना बच्चनगिरी करूच दिली नाही नागराजने’,असं का म्हणाला जितेंद्र? ‘सत्यमेव जयते’मध्ये विजय यांनी सांगितलं, ‘ही मुलं जेव्हा मैदाना खेळतात तेव्हा ते वाईट सवयींपासून दूर राहतात हे मला तेव्हा जाणवलं. एक शिक्षक आणखी दुसरं काय देऊ शकतो?’ ‘जे खेळाडू आले होते ते झोपडपट्टीमध्ये राहत होते. मला त्यांच्यासाठी काम करायचं होतं तर मला याच नावासोबत कायम राहायचं होतं’, असं ते टेड्स टॉकशी बोलताना म्हणाले. स्लम सॉसर खूप प्रसिद्ध झालं. जसजसा क्लब वाढत गेला तसतसं शहर आणि जिल्हा पातळीवर मॅच आयोजित केल्या जाऊ लागल्या. प्रसारमाध्यमांनीही याची रिपोर्टिंग करायला सुरुवता केली आणि मुलांमध्ये हा ग्रुप जॉईन करण्याची उत्सुकता वाढली. 2007 साली स्लम सॉसरची नॅशनल टुर्नामेन्ट बीबीसीनेही कव्हर केली होती. त्यानंतर बारसे यांना दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये बोलवण्यात आलं होतं, जिथं ते नेल्सन मंडेला यांनाही भेटले होते. हे वाचा - ‘‘झुंड’ एक मास्टरपीस’, मराठमोळ्या नागराज मंजुळेंचा चित्रपट पाहून धनुष भावुक विजय यांचा मुलगा तो यूएसमध्ये राहत होता त्याने अमेरिकेतील न्यूजपेपरमध्ये आपल्या वडिलांबाबतचा लेख वाचला. त्यानंतर वडिलांना मदत करण्यासाठी तो भारतात परतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.