स्वानंदी टिकेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. स्वानंदीने नुकतंच गायक - संगीतकार आशिष कुलकर्णी सोबत साखरपुडा केला.
स्वानंदीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. तिचा साखरपुड्यातील लूक चाहत्यांना खूप भावला आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या या लूकचं कौतुक केलं आहेस.
स्वानंदीने काल रविवारी 23 जुलैला साखरपु़ड्याचा फोटो पोस्ट केला. या फोटोवर एका युजरने कमेंट केली आहे की, किती सुंदर दिसत आहात. कुठेही मेकअपचा भपका नाही, अतिशय सोबर पण तितकीच गरजेची ज्वेलरी, आणि सगळ्यात महत्वाचं साडी नेसली आहेस.. खूपच गोड.. अभिनंदन दोघांचे. ही कमेंट सध्या चांगलीच चर्चेत आहे
दरम्यान स्वानंदीने साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. ज्याला तिनं And We’re Engaged कॅप्शन दिलं आहे.
स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीने शुक्रवारी रात्री एक फोटो शेअर केला होता. यात स्वानंदीच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसत होती. तर स्वानंदीचा बॉयफ्रेंड तिच्या गालावर किस करताना दिसतो आहे.