पाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी

जेव्हा क्रिकेटच्या मैदानात भारत- पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा भारतीय प्रेमींना फक्त पाकिस्तानचा दारुन पराभव करण्याचीच अपेक्षा असते.

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 02:46 PM IST

पाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी

वर्ल्ड कप कोणता देश जिंकतो याकडे साऱ्यांचं लक्ष आहे पण त्यातही आज हा प्रश्न गौण झाला आहे. भारत- पाकिस्तानचा आजचा सामना कोण जिंकणार हेच सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. जेव्हा क्रिकेटच्या मैदानात भारत- पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा भारतीय प्रेमींना फक्त पाकिस्तानचा दारुन पराभव करण्याचीच अपेक्षा असते. सामन्याआधी बॉलिवूडच्या कोणत्या सेलिब्रिटींनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले ते आम्ही सांगणार आहोत.

परेश रावल- पुलवामा हल्ल्यानंतर परेश यांनी आपला राग ट्विटरवर व्यक्त करत म्हटलं की, ‘हल्लेखोरांना कडक शिक्षा दिली गेली पाहिजे. बाहेरच्यांसोबतच घरातील शत्रूंनाही नष्ट केलं पाहिजे. आपल्या जवानांसाठी आपल्याही काही जबाबदाऱ्या आहेत.’ परेश यांनी वृत्तवाहिन्यांना त्यांच्या कोणत्याच शोमध्ये पाकिस्तानी नागरिकाला न बोलवण्याचं आवाहन केलं. त्या पिसाळलेल्या कुत्र्यांना आपल्या घरी येण्यास परवानगी नाही. त्यांना त्यांचं मरू दे असंही ते म्हणाले.

प्रियांका चोप्रा- भारतीय वायूदलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केल्यानंतर २६ फेब्रुवारीला प्रियांकाने एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये प्रियांकाने भारतीय सेनेचं कौतुक करत ‘जय हिंद’ असं लिहिलं होतं. याशिवाय IndianArmedForces असा हॅशटॅग वापरला होता. प्रियांकाच्या जय हिंद लिहिणं पाकिस्तानला फारसं आवडलं नाही. तिच्याकडून यूनिसेफचे गुडविल अँबेसिडर हे पद काढून घेण्याची मागणी त्यांनी केली होती.

Loading...

जावेद अख्तर- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जावेद यांनी ट्विटरवरून सडेतोड उत्तर दिलं होतं. इम्रान दरवेळी हे आम्ही केलं असं तुम्ही कसं बोलू शकता हा प्रश्न विचारतात. यावर जावेद म्हणाले की, ‘जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हा एका पाकिस्तानी सूत्रसंचालकाने हा हल्ला आम्ही केला असं तुम्ही कसं बोलू शकता असा प्रश्न विचारला होता. असे हल्ले कोणताही देश करू शकतो असंही तो म्हणाला होता. यावर मी त्याला म्हटलं की, मी तुम्हाला तीन पर्याय देतो त्यातून तुम्ही एक ठरवा. पहिलं- ब्राझील, दुसरं- स्वीडन- तिसरं- पाकिस्तान.’

कंगना रणौत- पुलवामा येथे सीआपीएफवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. हल्ल्यानंतर कंगनाने पाकिस्तावर बंदी घालणं हा उपाय नसून त्यांचा नायनाट करणं हाच एक उपाय असल्याचं म्हटलं होतं.

स्वरा भास्कर- पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने भारतीय पायलट विंग कमांडर अभिनंदन आणि भारतावर निशाणा साधला होता. याला प्रत्युत्तर म्हणून स्वराने तिची शाळा घेतली होती. स्वराने लिहिले की, ‘तुझी आणि तुझ्या विचारसरणीची कीव येते. तुझा आनंद असूरी आहे तर आमचा जवान, शूर, सुसंस्कृत आणि पकडल्या गेल्यानंतरही सन्मानित आहे.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 02:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...