घरगुती हिंसेबाबत अभिनेत्री श्वेता तिवारीचा भावुक VIDEO, महिलांना केलं आवाहन

घरगुती हिंसेबाबत अभिनेत्री श्वेता तिवारीचा भावुक VIDEO, महिलांना केलं आवाहन

Shweta Tiwari on Domestic Violence: टीव्ही इंडस्ट्रीची लोकप्रिय (TV Actress) अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) काल आंतरराष्ट्रीय महिला दिनी (International Women's Day) एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने आपल्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अनेक दुःखाचा पाढा सांगितला आहे.

  • Share this:

मुंबई, 09 मार्च: टीव्ही इंडस्ट्रीची लोकप्रिय (TV Actress) अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) काल आंतरराष्ट्रीय महिला दिनी (International Women's Day) समस्त महिला वर्गाला उद्देशून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये श्वेता तिवारीने घरगुती हिंसाचाराबाबत (Domestic Violence) आवाज उठवण्याचं आवाहन महिलांना केलं आहे. यावेळी श्वेताने स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील दुःखही बोलून दाखवलं आहे. तसेच त्यांनी आपल्या छोट्या मुलीसाठी खास संदेशही दिला आहे.

टीव्ही इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री असूनही श्वेता तिवारीला घरगुती हिंसाचाराला सामोरं जावं लागलं आहे. तिने आतापर्यंत दोन वेळा लग्न केली आहेत. पण दोन्ही लग्न फार काळ टिकू शकली नाहीत. असं असलं तरी दुःखाला कवटाळत न बसता श्वेताने स्वतः च्या हिमतीवर आपल्या मुलीचं संगोपन करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या आयुष्यात आलेल्या या चढ उताराने खचून न जाता तिने आपल्या आयुष्यात पुढे गेली आहे. तिने काल महिला दिनाचं औचित्य साधून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने घरगुती हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिलांना आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे.

श्वेताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे. तिने या व्हिडिओत पीडित महिलांना मार्गदर्शन केलं आहे. तसेच घरात अन्याय होतं असेल, तर काय करायला हवं याचा मार्गही त्यांनी सांगितला आहे. या व्हिडिओत श्वेताने आपल्या मुलीला उद्देशून म्हटलं की, 'मी माझ्या आयुष्यात खूप त्रास सहन केला आहे. पण माझ्या मुलीने अशा परिस्थितीतून जाऊ नये, अशी इच्छा आहे. जेव्हा मला दुर्बल असल्याचं वाटलं, तेव्हा मी माझ्या चांगल्या दिवसांचा विचार केला. त्यामुळे मी माझ्या मुलीच्या प्रत्येक वळणावर मी तिच्यासोबत राहिल, तिला कधीही एकटं पडू देणार नाही, असंही तिने आपल्या व्हिडिओत म्हटलं आहे.

हे ही वाचा - दोन घटस्फोटांनंतर श्वेता तिवारीनं पहिल्यांदाच बोलून दाखवली मनातली सल, म्हणाली...

ज्या महिला गुपचूपपणे घरगुती हिंसाचार सहन करत आहेत. त्यांनाही श्वेताने बहुमोल संदेश दिला आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटलं की, ज्या महिला निमूटपणे घरगुती हिंसाचार सहन करीत आहे. त्यांनी गप्प बसू नका, अन्यायाविरोधात आवाज उठवा. किमान तुमच्या मुलीचा विचार करून आवाज उठवा. कारण तुम्ही हिंसाचार सहन केला, तर तुमच्या मुलीही घरगुती हिंसाचार सहन करायला शिकतील. त्यामुळे अन्याविरोधात वेळीच आवाज उठवा आणि तुमच्या मुलीला एक मजबूत संदेश द्या.' शिवाय काही समस्या आल्यास 181 या क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवा, असंही श्वेतानं म्हटलं आहे. तिचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.

Published by: News18 Desk
First published: March 9, 2021, 5:21 PM IST

ताज्या बातम्या