मुंबई, 5ऑक्टोबर- अभिनेत्री मुमताज (Actress Mumtaz) यांनी 60-70च्या दशकात आपलं अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मुमताज बॉलिवूडमधल्या सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. आपलं सौंदर्य आणि नृत्यासाठी त्या ओळखल्या जात होत्या. मुमताज यांचं नाव अनेक को-स्टार्ससोबत जोडलं गेलं. यामध्ये अभिनेते शम्मी कपूर (Shammi Kapoor) यांच्याबरोबरच्या अफेअरच्या चर्चा सर्वाधिक रंगल्या होत्या. शम्मी कपूर यांनी त्यांना लग्नासाठी (marriage) प्रपोज केलं होतं; मात्र मुमताज यांनी लग्नाला नकार दिला होता. अलीकडेच एका मुलाखतीत मुमताज यांना दोघांच्या नात्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मुमताज यांनी त्यावर भाष्य केलं. याबाबतचं वृत्त 'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलं आहे.
इराणी असलेल्या मुमताज यांनी वयाच्या 11व्या वर्षी 1958 साली 'सोने की चिडिया'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी दो रास्ते, आदमी और इंसान, खिलोना, तेरे मेरे सपने, हरे रामा हरे कृष्णा यांसारख्या चित्रपटांमधून प्रसिद्धी मिळवली. अपना देश, लोफर, झील के उस पार, रोटी, प्रेम कहानी आदी चित्रपटही त्यांनी केले.
अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत मुमताज यांनी सांगितलं, की शम्मी कपूर श्रीमंत आणि लोकप्रिय होते; मात्र लोकांना समजणार नाही की त्यांनी त्याच्याशी लग्नगाठ बांधण्यास नकार का दिला? शम्मी यांना नाकारल्याच्या घटनेवर कोणाचाही विश्वास बसत नाही; मात्र शम्मी यांनी जितकं प्रेम दिलं तितकं प्रेम आपण कधीच अनुभवलं नव्हतं, अशी कबुलीही मुमताज यांनी दिली.
(हे वाचा:'.... तर नस कापून घेईन' अभिनेता Kartik Aaryan ला चाहतीने दिली धमकी!)
त्यांच्याऐवजी मुमताज यांनी मयूर माधवानी (Mayur Madhavani) यांना मुमताज यांनी आपला जीवनसाथी म्हणून निवडलं. 'अनेकांना माझ्याशी लग्न करायचं होतं; पण मी कोणाबरोबर आनंदी राहू शकेन, हे मला ठरवायचं होतं. शम्मी कपूर माझ्याशी खूप प्रेमळ आणि काळजी घेणारे होते. आम्ही एकमेकांच्या प्रेमातही पडलो होतो. कोणालाही विश्वास नव्हता, की मी त्यांना लग्नासाठी नकार दिला. कारण श्रीमंतांमध्ये शम्मी खूप वरच्या पातळीचे होते. त्यामुळे मुमताज शम्मीला नकार कसा देऊ शकते, असंही बोललं जायचं. जेव्हा मी मयूर माधवानींशी लग्न केलं तेव्हा लोकांचा विश्वास बसला, की मी शम्मीला नकार दिला. देवाच्या कृपेने मयूर माधवानींकडेसुद्धा भरपूर संपत्ती आहे,' असंही मुमताज म्हणाल्या.
'कपूर घराण्याच्या परंपरेनुसार त्यांच्या घरातल्या सुनांना अभिनय करण्यास मनाई होती. शम्मीजींनी मला सांगितलं, की लग्नानंतर मला माझं करिअर सोडावं लागेल. त्या लहान वयात मी खूप महत्त्वाकांक्षी होते आणि मला कुठं तरी पोहोचायचं होतं. मला माझ्या कुटुंबालाही स्थिरस्थावर करायचं होतं. त्यामुळे मला नुसतं घरी बसून राहायचं नव्हतं,' असं मुमताज यांनी 2020 मध्ये इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.मुमताज यांनी फिरोज खानसोबतच्या (Feroze Khan) विवाहाच्या अफवांबद्दलदेखील माहिती दिली. त्यांनी आपल्याला कधीही प्रपोज केलं नाही. ते खूप जवळचे मित्र होते आणि तसंच असतं, तर त्यांनी आपल्या प्रेमाची थेट कबुली दिली असती, असंही मुमताज यांनी सांगितलं.
(हे वाचा:करीनाने का नाही केलं ग्रँड वेडिंग? रणधीरनीच केला मुलीच्या लग्नाबाबत मोठा खुलास)
मुमताज यांनी सांगितलं, 'कोणतीही महिला फिरोझ आणि शम्मीच्या प्रेमात पडली असती. फिरोझ यांच्याशी लग्न करणं म्हणजे तलावात उडी मारण्यासारखं होतं. तसं करणं म्हणजे हार्टब्रेकच झाला असता. कारण मी तो अनुभव शम्मीजींच्या बाबतीत घेतला होता. मला पुन्हा तो अनुभव नको होता. मी त्यांच्याशी मैत्री दृढ ठेवण्याचा निर्णय घेतला. ती त्यांच्या मृत्यूपर्यंत कायम राहिली. दोघांचे संबंध दुसर्या मार्गाने गेले असते तर ते तुटले असते आणि मैत्रीही राहिली नसती.'फिरोज यांचा मुलगा फरदीन आणि मुमताज यांची कन्या नताशा यांनी एकमेकांशी विवाह केला आहे. ते दोघं एकमेकांसोबत खूश आहेत, असंही मुमताज यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment