मुंबई, 4 ऑक्टोबर : सोनी वाहिनीवरील कपिल शर्माच्या 'The kapil sharma show' मध्ये आपल्याला 90s च्या कलाकारांपासून ते अगदी मोठ मोठे खेळाडू, क्रिकेटर पाहायला मिळतात. त्यात हल्लीच या सेटवर करीना कपूर खानच्या वडिलांनी हजेरी लावली होती. रणधीर कपूर यांनी या शोच्या दरम्यान त्यांच्या आणि सैफ यांचा लग्नातील एक किस्सा सांगितला.
गेल्या आठवड्यात 'द कपिल शर्मा शो' 'The Kapil Sharma Show' मध्ये बॉलिूवूड 90s अभिनेता रणधीर कपूर (Randhir Kapoor in Kapil Sharma show) आणि त्यांची मुलगी Karishma kapoor करिश्मा कपूर यांची सेटवर आपली उपस्थिती दर्शवली. शोच्या दरम्यान कपिल आणि रणधीर कपूर व करिश्मा कपूर यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या, त्यावेळी रणधीर यांनी करिना कपूर च्या ग्रँड वेडिंग करण्यान मागचा एक किस्सा सांगितला.
करीना कपूर खान Kareena Kapoor Khan हिनं ज्यावेळेस मला सांगितले की, मला Saif Ali Khan सैफ आली खान सोबत लग्न करायचं आहे, त्यावेळी मी खूप जास्त उत्सुक झालो होतो, की चला आपण हे लग्न अगदी धुमधमक्यात मोठ्या जल्लोषात पार पाडू, त्यावर करीना त्यांना म्हणाली होती, की मला माझे लग्न 100 जणांच्या हजेरीत पार पाडायचे आहे.
रणधीर कपूर त्यावर तिला म्हणाले...
आपल्या कुटुंबातील एकूण सदस्य हेच 350 कपूर आहेत. त्यामध्ये आपल्याला 100 माणसांनमध्ये लग्न कसा करता येईल? त्यावर करीना म्हणाली होती, मला माझं लग्न 100 माणसांनमध्येच करायचे आहे, आणि जर तुम्हाला अधिक माणसांची उपस्थिती लावयची असेल तर, तुम्ही तुमचं लग्न करा.
करीना कपूर Kareena Kapoor Khan आणि सैफ अली खान Saif Ali Khan यांचे लग्न 16 ऑक्टोबर 2012 मध्ये फार कमी लोकांच्या उपस्थितीत झाले. तरीही या दोघांच्या Wedding Photos ची अजूनही चर्चा सुरू आहे. करीना कपूर खान हिला दोन मुलं आहेत, एक तैमूर ( Taimur ) आणि एक जेह ( Jeh ). शिवाय ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असताना दिसते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Kareena Kapoor, The kapil sharma show, Wedding