मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'.... तर नस कापून घेईन' अभिनेता Kartik Aaryan ला चाहतीने दिली धमकी!

'.... तर नस कापून घेईन' अभिनेता Kartik Aaryan ला चाहतीने दिली धमकी!

बॉलिवूड अभिनेता(Bollywood Actor) कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) आपल्या गुड लुक्स आणि अजब सेन्स ऑफ ह्युमरने तरुणाईला अक्षरशः वेड लावलं आहे.

बॉलिवूड अभिनेता(Bollywood Actor) कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) आपल्या गुड लुक्स आणि अजब सेन्स ऑफ ह्युमरने तरुणाईला अक्षरशः वेड लावलं आहे.

बॉलिवूड अभिनेता(Bollywood Actor) कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) आपल्या गुड लुक्स आणि अजब सेन्स ऑफ ह्युमरने तरुणाईला अक्षरशः वेड लावलं आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 5 ऑक्टोबर- बॉलिवूड अभिनेता(Bollywood Actor) कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) आपल्या गुड लुक्स आणि अजब सेन्स ऑफ ह्युमरने तरुणाईला अक्षरशः वेड लावलं आहे. कार्तिकने अनेक चित्रपटासोबत चाहत्यांचं मन जिंकलं आहे. कार्तिक फक्त चित्रपटचं नव्हे तरसोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असतो. तो सतत आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. नुकताच व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्राम काही वेळेसाठी बंद झाल्यानंतर कार्तिकने ट्विटरचा आधार घेत चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी अनेक चाहत्यांच्या प्रश्नांना कार्तिकने पटापट उत्तरे दिली. दरम्यान एका चाहतीने कार्तिकला चक्क नस कापण्याची धमकी दिली. त्यामुळे अभिनेता बुचकळ्यात पडला.

बॉलिवूड कलाकार सतत आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असतात. यावेळी चाहते त्यांना अनेक प्रश्न विचारत असतात. आणि कलाकारही त्यांची आपुलकीने उत्तरे देत असतात. नुकताच अभिनेता कार्तिक आर्यननेही आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. काल रात्रीपासून काही तासांसाठी भारतामध्ये व्हॉट्सऍप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान कार्तिकने चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला. यावेळी त्याने चाहत्यांसोबत 'अस्क मी एनीथिंक' सेशन केलं. यावेळी अनेक चाहत्यांनी कार्तिकला मजेशीर प्रश्न विचारले कार्तिकनेही त्यांना आपल्या अंदाजात उत्तरे दिली. मात्र एका चाहतीच्या ट्विटने कार्तिकला घाबरवलं.

(हे वाचा:अभिनेत्री Yami Gautam ला आहे हा गंभीर आजार; फोटो शेअर करत स्वतः केला खुलासा)

कार्तिक आर्यनच्या 'अस्क मी एनीथिंक' दरम्यान त्याची एक चाहती त्याला प्रश्न विचारत असते. मात्र खूप वेळ झाला तरी अभिनेत्याचा रिप्लाय येत नाही. त्यामुळे ती चाहती नाराज होऊन पुन्हा ट्विट करते 'दुसऱ्यांना वेळ देऊन झालं तर मलाही रिप्लाय कर, ओके बाय, पुढे ती म्हणते रिप्लाय नाही दिलासा तर मी माझी नस कापून घेईन'. यावर कार्तिक आर्यनने आपल्या चहातील शांत करत अत्यंत इमोशनल उत्तर दिलं. कार्तिकने आपल्या या चाहतीला उत्तर देत कार्तिकने ट्विट केलं 'कधी असा विचार पण करू नकोस. सोबतचं हार्टचा इमोजीही शेअर केला आहे'.

(हे वाचा:इरफान खानच्या आठवणीत पुन्हा भावुक झाला मुलगा बाबिल; शेअर केला थ्रोबॅक PHOTO)

दरम्यान कार्तिकी आर्यनला इतर चाहत्यांनीही मजेशीर प्रश्न विचारले आहेत. एका चाहत्याने ट्विट करत विचारलं 'भावा लॅम्बो कशी आहे?' यावर उत्तर देत कार्तिकने म्हटलं भाव कमी ऍव्हरेज देते'. तर दुसऱ्या चाहत्याने विचारलं 'तुझ्या इतक्या ऍक्टिव्ह राहण्यामागे कोणतं गुपित आहे?'यावर उत्तर देत कार्तिकने अक्षय कुमारचं नाव घेतलं आहे. तर आणखी एका चाहत्याने प्रश्न विचारत कार्तिकला विचारलं 'फ्रेडीचा अनुभव कसा होता?' यावर कार्तिकने म्हटलं 'शानदार, अजूनही फ्रेडी माझ्या अंगातून गेलेला नाही'. अशा पद्धतीने कार्तिकने आपल्या चाहत्यांशी संवाद साधला.

First published:

Tags: Entertainment, Kartik aryan