Home /News /entertainment /

कोणाचं काय तर कोणाचं काय; भर वादळात महिलांचा सोसायटीत सुरू होता गरबा, Video Viral

कोणाचं काय तर कोणाचं काय; भर वादळात महिलांचा सोसायटीत सुरू होता गरबा, Video Viral

महिलांचा एक घोळका त्यांच्याच सोसायटीत एकत्रित पणे भर पावसात गरबा खेळत आहेत. (Mumbai women’s garba in rain) तर पावसाचा आनंद लुटत आहेत

  मुंबई 17 मे : हौशी माणसं कधी काय करतील याचा काही नेम नाही. मग त्यांना वादळ ही अडवू शकत नाही. याचीच प्रचिती मुंबईतील एका सोसायटीत आलेली पाहायला मिळत आहे. येथील महिलांनी मुंबईत धडलेल्या पहिल्या पावसासह वादळाचाही आनंद लुटला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Mumbai women dances in rain) या व्हिडीओत आपण पाहू शकता महिलांचा एक घोळका त्यांच्याच सोसायटीत एकत्रित पणे भर पावसात गरबा खेळत आहेत. (Mumbai women’s garba in rain)  तर पावसाचा आनंद लुटत आहेत. तर त्यांना वादळाचीही भीती वाटत नाही. त्यामुळे वादळाच्या भीतीने घरात बसलेल्या मुंबईकारांनी या व्हिडीओवर निरनिराळ्या कमेंट्स केल्या आहेत. काहींना व्हिडीओ आवडला आहे तर अनेकांनी यावर टीका देखिल केली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Voompla (@voompla)

  तर काहींनी कोरोनाच्या या काळात एकत्रित पणे गरबा खेळणं ते देखिल तौक्ते (Taukte)  वादळ मुंबईत धडकत असताना कितपत योग्य अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत. आनंद लुटणं किंवा मजा मस्ती करणं केव्हाही वाईट नसतं पण कोरोनाच्या या कठिण काळात एकत्र जाणून आनंद साजरा करण कदाचित धोक्याचही ठरू शकतं.

  'देऊळबंद', 'मुळशी पॅटर्न'चे गीतकार प्रणीत कुलकर्णीचं निधन; प्रवीण तरडे भावुक

  सध्या या महिलांचा हा व्हिडीओ अनेकांच्या मोबाईल वर पाहायला मिळत आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता हा आनंद थोडा लांबणीवर गेलेलाच बरा. मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात आज पावसाच्या मुसळधार सरी बरसताना दिसल्या. याशिवाय आजूबाजूच्या परिसरात वादळाचाही तडाखा प्रामुख्याने जाणवत होता. अनेक ठिकाणी वादळामुळे नुकसान ही झालं आहे. तर मुंबईत अनेक सखल भागांत पाणी साठलं होतं. संध्याकाळच्या सुमारास पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरीही रिमझीम सुरूचं आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Photo video viral

  पुढील बातम्या