Home /News /entertainment /

'देऊळबंद', 'मुळशी पॅटर्न'चे गीतकार प्रणीत कुलकर्णीचं निधन; प्रवीण तरडे भावुक

'देऊळबंद', 'मुळशी पॅटर्न'चे गीतकार प्रणीत कुलकर्णीचं निधन; प्रवीण तरडे भावुक

माझा प्रणित दादा गेला...सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभु हरपला; अशी भावना प्रवीण तरडे याने व्यक्त केली आहे.

    मुंबई, 17 मे : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार प्रणीत कुलकर्णी यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे याने याबाबत सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. प्रणीत कुलकर्णी यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये प्रवीण तरडे यांच्यासोबत काम केलं आहे. प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की,  देऊळबंदसोबत लेखन-दिग्दर्शन आणि देऊळबंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीररावचे गीतकार, सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभू हरपला. अ रा रा खतरनाक, उन उन वठातून, आभाळा आभाळा, गुरूचरित्राचे कर पारायण, हंबीर तु खंबीर तु अशा एका पेक्षा एक गाणी लिहून प्रणीतदादा गेला. कायमचा..गीतकार, लेखक, दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी बद्दल लिहायला लागलो तर दिवस पुरायचा नाही...नंतर सविस्तर लिहिनच.. गीतकार प्रणीत कुलकर्णी यांनी अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽहे गीत लिहिले आहे. या गाण्याने सोशल मीडियासह अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला. आजही अनेक कार्यक्रमांमध्ये हे गाणं आवर्जुन वाजवलं जातं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Marathi cinema

    पुढील बातम्या