मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Rhea Chakraborty Case: रिया चक्रवर्ती जाणार IIFA ला; कोर्टाने दिली विदेश प्रवासाला मान्यता

Rhea Chakraborty Case: रिया चक्रवर्ती जाणार IIFA ला; कोर्टाने दिली विदेश प्रवासाला मान्यता

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty)  न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून तिच्या विदेश प्रवासाठी मान्यता देण्यात आली आहे. रिया दुबईत होणाऱ्या IIFA सोहळ्यात हजेरी लावणार आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून तिच्या विदेश प्रवासाठी मान्यता देण्यात आली आहे. रिया दुबईत होणाऱ्या IIFA सोहळ्यात हजेरी लावणार आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून तिच्या विदेश प्रवासाठी मान्यता देण्यात आली आहे. रिया दुबईत होणाऱ्या IIFA सोहळ्यात हजेरी लावणार आहे.

मुंबई, 01 जून: अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Actor Rhea Chakraborty)  संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई विशेष न्यायालयाने (Mumbai Special Court) रिया चक्रवर्तीला एका आठवड्यासाठी विदेश प्रवासासाठी मंजूरी दिली आहे. दुबई (Budai) येथे होणाऱ्या  आयफा IIFA सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी कोर्टाने  अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सशर्त परवानगी दिली आहे. IIFA ला जाण्यासाठी रियाला 1 लाखांची अनामत रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अबूधाबीच्या भारतीय दूतावासात दररोज हजेरी लावण देखील अनिवार्य असणार आहे.  तसेच रिया ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणचा पत्ता, ती कोणासोबत जाणार आहे त्याचं ओळखपत्र इ. माहिती तपास अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे. तसेच ती ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी अमली  पदार्थाच्या संबंधीत कोणताही गुन्हा करणार नाही, अशा विविध अटी घालण्यात आल्या आहेत.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती 2020मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात चर्चेत आली होती. नाक्रोटिक्स कंट्रोल ब्यूरोने रियाला ड्रग्ज प्रकरणात आरोपी घोषित केलं होतं.  त्यामुळे रियाला देश सोडून जाण्यास सत्त मनाई करण्यात आली.

IIFAसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी रियाने एक याचिका मुंबई विशेष न्यायालयाला सादर केली होती. त्यात तिने म्हटलं होतं, IIFA ग्रीन कार्पेटसाठी, एक पुरस्कार देण्यासाठी मला तिथे आमंत्रित करण्यात आले आहे.  माझे आई वडील आर्थिकदृष्ट्या पुर्णपणे माझ्यावर अवलंबून आहेत. तसेच  सिनेसृष्टीत आपलं नाव कमावण्यासाठी असे पुरस्कार सोहळे तिच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. रियाने सादर केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली आणि तिच्या विदेश प्रवासाठी परवानगी देण्यात आली.   रियाने केलेल्या आवेदनात तिने म्हटलं आहे की, ती नियमितपणे न्यायालयाच्या सुनावणीसाठी उपस्थित असते. तिच्या या विदेश प्रवासामुळे तिच्या सुनावणींवर कोणताही परिणाम होणार नाही.

2020मध्ये रियाला ड्रग्ज प्रकरणात 8 सप्टेंबरला एनसीबीकडून ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर जवळपास एक महिन्यांनंतर रियाला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता.  तपासाअंती रिया चक्रवर्तीचा ड्रग्ज प्रकरणाशी कोणताही संबंध नव्हता. तिने कथितरित्या कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज खरेदी केले नव्हते, असे उच्च न्यायालयानं म्हटलं होतं.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Rhea chakraborty, Sushant singh rajput case