मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'...मग त्या हिंदी निर्मात्यांवर कारवाई करण्याची धमक दाखवा',अमेय खोपकरांचा सरकारला टोला

'...मग त्या हिंदी निर्मात्यांवर कारवाई करण्याची धमक दाखवा',अमेय खोपकरांचा सरकारला टोला

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कोरोना काळातील नियम मोडणाऱ्या चित्रपट निर्मात्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कोरोना काळातील नियम मोडणाऱ्या चित्रपट निर्मात्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कोरोना काळातील नियम मोडणाऱ्या चित्रपट निर्मात्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई, 16 जून- ‘कोरोनाचं संकट अजूनही दूर झालेलं नाही. अस खरच यंत्रणांना वाटत असेल, तर मग जे कोरोना संदर्भाचे नियम पाळत नाहीत. त्यांचावर कारवाई करण्याची धमक सरकारने दाखवावी’. असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी लगावला आहे. त्यांनी ट्वीट करत, कोरोना काळातील नियम तोडणाऱ्या चित्रपट निर्मात्यांवर टीका केली आहे.

अमेय खोपकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे, ‘राज्य सरकारने मुंबईत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शुटींगला परवानगी देलेली आहे. आणि तेही बायो-बबलमध्ये. मराठी निर्मात्यांकडून हे नियम काटेकोरपणे पाळले जातायत पण अनेक ठिकाणी हिंदी निर्मात्यांकडून या नियमांचं उल्लंघन होतं आहे’.

— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 16, 2021

 ‘यंत्रणाने त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक दाखवावी’-

तसेच अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे, ‘कोरोनाचं संकट अजून दूर झालेलं नाही, असं खरंच यंत्रणांना वाटत असेल तर मग त्यांनी जे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक दाखवावी. आणि जर कोरोनाचे आकडे कमी होत असतील तर सरकारने शुटिंगसाठी बनवलेल्या नियमांचा नव्याने विचार करावा, तरच या इंडस्ट्रीत सर्वकाही सुरळीत होऊ शकेल’. असंही त्यांनी म्हटलं आहे.

(हे वाचा: 'त्या' डायलॉगामुळे अडकले मिथुन; वाढदिवसादिवशीच होतेय पोलीस चौकशी  )

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात अक्षरशः थैमान घातलं आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवांवर बंदी घातली होती. त्यामुळे महाराष्ट्रील मालिका आणि इतरसर्व शुटींग बंद करण्यात आले होते. मात्र सध्या कोरोनाचं कमी झालेलं प्रमाण पाहून त्या त्या भागासाठी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. आणि चित्रिकरणासाठी सुद्धा नवीन नियम अर्थातच एनओसी तयार करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Lockdown, Mumbai, Shooting