• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • NCB च्या ताब्यात असलेला आर्यन रडतोय ढसाढसा, शाहरुखसोबत फोनवर झालं बोलणं

NCB च्या ताब्यात असलेला आर्यन रडतोय ढसाढसा, शाहरुखसोबत फोनवर झालं बोलणं

एनसीबीचे अधिकारी आर्यनची सतत चौकशी करत आहेत.

 • Share this:
  मुंबई, 04 ऑक्टोबर: फिल्म स्टार शाहरुख खानचा (Bollywood actor Shah Rukh Khan's son) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या पोलीस कोठडीत आहे. एनसीबीनं आर्यन खानला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला रविवारी अटक करण्यात आली. एनसीबीचे अधिकारी आर्यनची सतत चौकशी करत आहेत. आर्यन खान चौकशी दरम्यान सतत रडत असल्याचीही माहिती मिळाली आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनच्या अटकेनंतर, कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून, एनसीबीने आर्यनला त्याचे वडील शाहरुख खानशी लँडलाईन फोनवरून बोलायला दिलं आहे. दोघं एकमेकांसोबत दोन मिनिटं बोलले. आर्यन एनसीबी मेसमधलं जेवणं जेवला. त्याला कोणत्याही प्रकराचंही अन्न पुरवलं गेलं नाही. हेही वाचा- शालेय शिक्षणमंत्री शाळेत, विद्यार्थ्यांशी मारल्या गप्पा; Must Watch शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईतील क्रूझमधून 8 लोकांना ताब्यात घेतलं होतं. नंतर रविवारी 3 जणांना अटक करण्यात आली. एनसीबीच्या मते, चौकशीदरम्यान अटक केलेल्यांनी वापरासाठी लपवलेली ड्रग्स बाळगल्याची कबुली दिली आहे. 4 वर्षांपासून ड्रग्स घेतोय आर्यन? आर्यन खान चौकशीदरम्यान सतत रडत असल्याचे सांगितलं जात आहे. एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तर शाहरुख खान आणि गौरी खान यांना माहिती होतं की त्यांचा मुलगा ड्रग्स घेतो. एनसीबीच्या चौकशीत असे उघड झालं आहे की, आर्यन जवळपास 4 वर्षांपासून ड्रग्स घेत होता. आर्यननं भारताबाहेर ब्रिटन, दुबई आणि इतर देशांमध्ये ड्रग्जचे सेवन केलं आहे. चौकशीत NCB ला दिली कबुली एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानने कबूल केले की तो या पार्टीचा भाग होता. त्यानं आपण चूक केल्याची कबुलीही दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यननं ड्रग्सचं सेवन केल्याचंही कबूल केलं आहे. त्याचवेळी, सूत्रांनी पुढे असंही सांगितलं आहे की, अभिनेता शाहरुख खानने एनसीबीच्या ताब्यात असलेल्या आपल्या मुलाच्या सुटकेसाठी प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांच्याशी संपर्क साधला आहे. ज्यांची टीम सध्या एनसीबीच्या कार्यालयात हजर आहे. दरम्यान, यासंदर्भात शाहरुख खानकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. हेही वाचा- कचरा दिसताच प्रियांका गांधींनी हातात घेतली झाडू, झाडून काढली खोली; Viral Video सुरुवातीच्या चौकशीत अभिनेत्याच्या मुलानं सांगितलं होतं की, या क्रुझवर गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं आणि त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं मानधन देण्यात आलेलं नव्हतं. केवळ आपल्या नावाचा वापर करुन इतरांना बोलावण्यात आलं होतं. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यनचा मोबाईलही जप्त केला आहे. ज्यात ड्रग्स संदर्भातले चॅट्स मिळाले आहेत. सुत्रांच्या मते,, जेव्हा या चॅट्सबद्दल चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यानं हौस म्हणून ड्रग्स घेतल्याचं कबूल केलं.
  Published by:Pooja Vichare
  First published: