Home /News /entertainment /

Mumbai Cruise Drugs Party: आर्यनसोबत असलेला Arbaaz Merchantt कोण व त्याचे सुहाना खानसोबत काय कनेक्शन आहे?

Mumbai Cruise Drugs Party: आर्यनसोबत असलेला Arbaaz Merchantt कोण व त्याचे सुहाना खानसोबत काय कनेक्शन आहे?

ड्रग्स प्रकरणात अरबाज मर्चंट हे नाव मोठे मानेले जात आहे. तो कोण आहे व त्याचे आर्यन व सुहानशी काय कनेक्शन आहे अशी चर्चा रंगली आहे.

  मुंबई, 03 ऑक्टोबर : एनसीबीने (NCB raid) मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका आलिशान क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केला. सुमारे 7 तास चाललेल्या छाप्यादरम्यान, एनसीबीनं (NCB) मोठ्या प्रमाणात ड्रग्स (large quantity of drugs) जप्त केली आहेत. एनसीबीनं यात एकूण 8 जणांना ताब्यात घेतलं असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. तसंच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Bollywood actor Shah Rukh Khan's son) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. आर्यन खानची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. याप्रकरणात आर्यनसह अरबाज मर्चंट (Arbaaz Merchantt ), मुनमुन धामेचा यांना अटक करण्यात आली आहे. अरबाज मर्चंट कोण आहे? ड्रग्स प्रकरणात अरबाज मर्चंट हे नाव मोठे मानेले जात आहे. अरबाज मर्चंटने आर्यन खानला या क्रूझवर आणले होते, अशी चर्चा आहे. यासोबतच, अरबाज मर्चंट अनेकदा ड्रग पार्ट्यांना जात असतो. अरबाज मर्चंटच्या फोन चॅटवरून त्याचे ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्याचे माहिती समोर आली आहे. त्यानंतर एनसीबी याप्रकरणाचा तपास करत आहे. तरी देखील अरबाज मर्चंट कोण आहे याची चर्चा रंगली आहे. वाचा : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अडचणीत, चौकशीत NCB ला दिली कबुली, म्हणाला; मी... अरबाज मर्चेंटला शाहरूखची मुलगी सुहाना खानही करते फॉलो अरबाज मर्चेंट हा आर्यन आणि सुहान खानचा मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. अरबाज एक अभिनेता आहे, इन्स्टावर देखील त्याचा चांगला चाहता वर्ग आहे. अरबाज मर्चेंट स्टार किड्ससोबत नेहमी पार्टी करताना दिसत असतो. सुहाना खानही इन्स्टावर त्याला फॉलो करते. तसेच अरबाज मर्चंटने अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया हिला देखील डेट केल्याची देखील चर्चा होती.
  मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर पार्टी चालली होती. कॉर्डेलिया कंपनीची ही क्रूझ आहे. एनसीबीच्या चौकशीदरम्यान आर्यन खानने स्वतःला निर्दोष घोषित केले आहे. आर्यनच्या मते, तो फक्त पाहुणे म्हणून पार्टीला गेला होता. आर्यन खान व्यतिरिक्त, आणखी 7 जणांचा समावेश होता असे एनसीबीच्या छाप्यात समोर आले आहे. आरसीन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा यांचा यामध्ये समावेश आहे. .
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Shahrukh khan, Shahrukh khan and abram

  पुढील बातम्या