मुंबई, 22 सप्टेंबर 2021 ; ‘अजूनही बरसात आहे’ **(Ajun hi Barsat Ahe )**या मालिकेतून अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या दोघांच्याही अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. या मालिकेतील या दोघांच्यातील वाद तर कधी प्रेम पाहायला प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या दोघांनी एकत्र यावे, लवकर लग्नगाठ बांधावी अशीच चाहत्यांची इच्छा आहे. मालिका सध्या एका विशिष्ट वळणावर आहे. आता या दोघांच्यात म्हणजे मीरा आणि आदिराज यांच्यामध्ये सानिका आली आली आहे. त्यामुळे मालिकेत नविन ट्वीस्ट (Ajun hi Barsat Ahe New Twist) आला आहे. मीरा आणि आदिराज यांच्यामध्ये नात्यात सानिकामुळे दुरावा येणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. सोशल मीडियावर देखील प्रेक्षकांनी यावरून मालिकेला ट्रोल केले आहे. काहींनी मालिकेत असं काही व्हायला नको असे देखील म्हटले आहे. तर काहींनी हे असंच होणार होते, असे म्हटले आहे. तर काहिंनी सानिकाला यापूर्वी कुठल्या तरी मालिकेत पाहिल्याचे म्हटले आहे. तर काहींनी सानिकाचे खरे नाव विचारले आहे. विविध कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत.आता येणारा काळच ठरवेल की, सानिकामुळे या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण होणार की प्रेम बहरून येणार. आता मालिका सानिकाभोवती फिरणार असेच काहीसे चित्र दिसत आहे. आता ही सानिका नेमकी कोण आहे आणि तिच्यामुळे मालिकेत काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आता हा नविन ट्वीस्ट प्रेक्षकांच्या पचनी पडणार का, हा देखील प्रश्न आहे. वाचा : सही रे सई! Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष; व्हाईट ड्रेसमध्ये दिसतेय परमसुंदरी
तब्बल आठ वर्षानी या मालिकेच्या माध्यमातून उमेश आणि मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या दोघांनी यापूर्वीचित्रपटांबरोबरच नाटकांमध्ये देखील एकत्र काम केले आहे. लग्न पाहावे करून या चित्रपटात देखील मुक्ता आणि उमेश यांनी एकत्र काम केलं आहे. आता या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले आहेत.