मुंबई 28 मे: अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (
Mrunmayee Deshpande) जवळपास वयाच्या पस्तिशीत पदार्पण करणार आहे. एवढा वयाचा पल्ला
(Happy Birthday Mrunmayee Deshpande) गाठल्यावरही फिट असणाऱ्या मृण्मयीच्या आयुष्यात एकेकाळी काहीसा तणाव निर्माण झाला होता. कलाकारांचं आयुष्य जेवढं चकमकीत दिसतं तसं कित्येकदा असत नाही हे अनेकांनी समजून घेणं गरजेचं आहे. इतर कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात असलेलं स्थैर्य, सुबत्ता या फिल्डशी निगडित लोकांच्या आयुष्यात यायला कित्येक वर्षं जावी लागतात. त्यामुळे लग्न, अपत्य, सेटल होणं याबद्दल काहीशी साशंकता असते.
मृण्मयीच्या आयुष्यातसुद्धा लग्नाआधी असा काळ आलेला की तेव्हा तिने सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या. प्रेमाबद्दल तिच्या होप्स नव्हत्या असं ती सुखदा खांडकेकरच्या 'अनसेंसर्ड' कार्यक्रमात ती सांगते, "स्वप्नील आयुष्यात येण्याआधी मी या गोष्टीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते की, आता आपल्याला ठरवून लग्न करायचं आहे. मला तर असे सल्लेही मिळाले होते की मॅट्रिमोनीवरून चांगलं स्थळ शोध शेवटी लग्न झालं की रडायचंच आहे बसमध्ये रडाण्याऐवजी मर्सिडीजमध्ये बसून रड. मी ही आता करायचं आहे म्हणून फॉर्मॅलिसाठी मुलं पाहत होते. स्वप्नील अशावेळी आयुष्यात आला जेव्हा मी सगळ्या आशा गुंडाळून ठेवल्या होत्या. पण त्याच्या इतक्या कणखर आणि खऱ्या व्यक्तीला भेटून माझं आयुष्य बदललं. माझा नव्याने प्रेमावर विश्वास बसला आणि पुन्हा नव्याने मी मला सापडले."
(Mrunmayee swapnil marriage)
मृण्मयी स्वप्नीलबद्दल
(mrunmayee Swapnil Lovestory) असंही सांगते की, "स्वप्नील माझा सपोर्टर आहे. आपण आयुष्यात अभेद्य असू शकतो, दणकट पैसे कमावू शकतो, चोख काम करू शकतो पण आपण असं करू शकतो हा विश्वास द्यायला कोणीतरी लागतं. आपल्याला प्रोत्साहन द्यायला, आपण आहोत तसे accept करून प्रेम करायला कोणीतरी लागतं तसा स्वप्नील आहे."
हे ही वाचा- 'जगातील पहिलं नाटकाचं संग्रहालय महाराष्ट्रात...' सुबोध भावेची पोस्ट चर्चेत
तिने असाही एक सल्ला दिला आहे, "तुमच्यावर प्रेम करणारा आणि तुम्हाला हवा तसा पार्टनर मिळतो मात्र थोडी वाट बघावी लागते. त्यामुळे वाट बघताना तडजोड करू नका. जर तुम्ही लाखात एक असाल तर छोट्याश्या प्रेमात समाधानी होऊ नका."
मृण्मयीने 2016 मध्ये स्वप्नील रावसोबत लग्नगाठ बांधली. स्वप्नील आणि मृण्मयी एका मॅट्रिमोनियल साईटवर भेटले. दोघांना भेटीगाठीतून एकमेकांबद्दल प्रेम वाटू लागलं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मृण्मयी आणि स्वप्नीलकडे कार्बन नावाचा गोड कुत्रासुद्धा आहे. मृण्मयी कायम तिच्या नवऱ्याचे आणि गोंडस कार्बनचे फोटो शेअर करत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.