Home /News /entertainment /

'जगातील पहिलं नाटकाचं संग्रहालय महाराष्ट्रात...' सुबोध भावेची पोस्ट चर्चेत

'जगातील पहिलं नाटकाचं संग्रहालय महाराष्ट्रात...' सुबोध भावेची पोस्ट चर्चेत

'मराठी नाट्य विश्व' या नाट्य संग्रहालयाच्या बोधचिन्हाचे नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झाले. याच पार्श्वभूमीवर अभिनेता सुबोध भावेने (subodh bhave)सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

    मुंबई, 28 मे- मराठी नाटकाचा समृद्ध इतिहास सांगणाऱ्या 'मराठी नाट्य विश्व' या नाट्य संग्रहालयाच्या बोधचिन्हाचे नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झाले. याच पार्श्वभूमीवर अभिनेता सुबोध भावेने (subodh bhave)सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राज्य सरकारसह मुंबई महापालिकेचे आभार मानले आहेत. सुबोध भावे याने इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने मराठी नाट्य-विश्व संदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सोबत एक पोस्ट देखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुंबोधनं म्हटलं आहे की, ''तुम्हा सगळ्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर करताना अतिशय अभिमान वाटतोय.'' वाचा-अल्लू अर्जुनने शेअर केला लेकासोबतचा क्युट फोटो, कॅप्शनने जिंकलं चाहत्यांचं मन ''जगभरात कुठेही नाटकाचं संग्रहालय नाही.जगातील पहिलं नाटकाचं संग्रहालय उभारण्याचा मान आपल्या महाराष्ट्राला मिळतोय.आणि हे संग्रहालय असणार आहे मराठी नाटकाचं"मराठी नाट्य विश्व"मुंबई येथे गिरगाव चौपाटी वर सद्य स्थितीत असलेल्या बिर्ला क्रीडा केंद्र च्या जागी हे भव्य दिव्य आणि मराठी नाटकाचा इतिहास सांगणार "मराठी नाट्य विश्व" उभं राहतय.मराठी नाटकाच्या सर्व शाखा आणि सर्वांना सामावून घेणारं हे संग्रहालय असेल.जगभरातील नाटकाच्या अभ्यासक आणि रसिक प्रेक्षकांसाठी हे एक आनंदाचं दालन असेल.ही कल्पना आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे यांची.त्यांच्या कल्पनेतून हे मराठी नाटकाचं संग्रहालय उभे रहात आहे.''
    ''महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होतंय.आणि आज मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते "मराठी नाट्य विश्व" चं बोधचिन्ह आणि वास्तूचं स्वरूप लोकार्पण करण्यात आलं.आम्हा सर्व रंगकर्मी आणि नाटकावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीने मी मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे मनापासून आभार व्यक्त करतो🙏🙏🙏🙏🙏''
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या